ठाणे : आनंद दिघे साहेबांचा चित्रपट सुपरहीट झाला आणि आपला विधानसभेचा पिक्चर देखील सुपरहीट झाला.. आता तिसरा सिनेमा आपल्याला काढायचा आहे. आता कोणता? त्याचे नाव काय? याची मला माहिती नाही. पण तो देखील सुपरहीट होणार आहे असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मी फोडाफोडी करत नाही, जे येतात ते आपोआप येतात असेही शिंदे म्हणाले.
महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे काही खासदार फुटणार असल्याचा दावा महायुतीचे नेते आणि शिंदे गटातील पदाधिकारी करत आहेत. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांना रंगू लागल्या आहेत. रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने एक वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू पदाधिकाऱ्यांपैकी एका असलेले राम रेपाळे हे म्हणाले, आता ट्रेलर सुरू आहे पिक्चर बाकी आहे.
त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले ते आता बोलू नका, आपले काम सुरू आहे…. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, विधानसभेचा पिक्चर सुपरहीट झाला.. आनंद दिघे साहेबांचा झाला आणि आपला देखील झाला. आता तिसरा सिनेमा आपल्याला काढायचा आहे. आता कोणता? त्याचे नाव काय? याची मला माहिती नाही. पण तो देखील सुपरहीट होणार आहे असे शिंदे भाषणात म्हणाले. आम्हाला फोडाफोडी करून काय करायचे आहे, मी कधीही फोडाफोडी करत नाही. जे येत आहेत ते आपोआप येत आहेत असेही शिंदे म्हणाले.