कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरे विविध विकास कामांमुळे झपाट्याने विकसित होत आहेत. या विकसित मार्गातील आणखी एक महत्वाचा टप्पा म्हणजे कल्याणमधील मेट्रो ५ मार्ग. कल्याण शहरातील खडकपाडा, बिर्ला महाविद्यालय या विस्तारित मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री येथे दिली.

एमसीएचआय कल्याण शाखेतर्फे गृहोत्सव प्रदर्शनाचे फडके मैदान येथे आयोजन केले होते. या प्रदर्शनाचा समारोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर आमदार विश्वनाथ भोईर, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, एमसीएचआय कल्याण शाखेचे अध्यक्ष राजेश गुप्ता, सचिव सुनील चव्हाण, माजी अध्यक्ष रवी पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे उपस्थित होते.

Saif Ali Khan attack case Mental health Titwala suspect
Video : सैफ अली खान हल्ला प्रकरणात पकडलेल्या टिटवाळ्यातील संशयित तरूणाच्या मनावर परिणाम? कुटुंबीयांची खंत
Buddha head Ratnagiri
Buddha head Ratnagiri: भव्य बुद्धशीर्ष व मोठा तळहात…
Dipesh Mhatre from Dombivli appointed as Assembly Constituency District Chief of shivsena uddhav balasheb thackeray
डोंबिवलीचे दीपेश म्हात्रे यांची विधानसभा क्षेत्र जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये ठिकठिकाणी अनोखे फलक
case registered against who sold clay pots by blocking road in kalyan
कल्याणमध्ये रस्ता अडवून मातीच्या कुंडी विकणाऱ्यावर गुन्हा दाखल
Attempted kidnapping of Birla College student in Kalyan
कल्याणमध्ये बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

ठाणे-भिवंडी-कल्याण ते तळोजा हा ठाणे जिल्ह्यातील महत्वाचा टप्पा मेट्रो मार्गाने जोडला जाणार आहे. यामुळे गर्दीचे विभाजन होऊन नागरिकांना सुखकर प्रवास करणे शक्य होणार आहे. कल्याणमधील नागरिकांच्या मागणीचा विचार करून, आणि शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कल्याणमधील मेट्रो मार्ग खडकपाडा, बिर्ला महाविद्यालय पर्यंत विस्तारित करण्यात आला आहे. कल्याण शहराच्या विस्तारित मेट्रो मार्गाचा शहाड परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे. कल्याणमधील विस्तारित खडकपाडा मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

कल्याण डोंबिवली शहराची लोकसंख्या वाढत आहे. वाढत्या नागरीकरणासाठी भविष्यातील या शहरांच्या पाणी प्रश्नाचा विचार करून काळू धरणाचा विचार करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांची तहान काळू धरण भागविणार आहे. काळू धरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे. यासाठी शासन प्रयत्नशील आहे. काळू धरणामध्ये वन विभागाची जमीन बाधित होत आहे. या जमिनीच्या बदल्यात ३५० कोटी रूपये वन विभागाला भरणा करण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.नवी मुंबईला मोरबे धरणाचा पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर नवी मुंबईच्या वाट्याचे १४० दशलक्ष लीटर पाणी कल्याण, डोंबिवली शहरांना देण्याचा विषय अनेक वर्ष प्रलंबित आहे. हा विषयही लवकर मार्गी लागेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कल्याण, डोंबिवली शहरांमधील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. कल्याण शहरातील मेट्रो मार्गाच्या विस्तारित कामाची निवीदा प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. विकासाची ही सकारात्मक पावले या शहराचा चेहरा बदलणार आहेत. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री.

Story img Loader