निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर शिंदे गटाची शिवसेना तसेच ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या काही शाखांवर दावा सांगितला जात आहे. याच कारणामुळे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे तसेच अन्य शिवसैनिकांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे. शिवसेनेच्या शाखा बळकावणाऱ्या शिंदे गटाला समज द्यावी अशी मागणी राजन विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही शाखा बळकावण्याचे काम सुरू

या पत्राबाबत राजन विचारे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “आज ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना आम्ही भेटून आलो. आम्ही त्यांना निवेदन दिले आहे. गेल्या सहा महिन्यापासून ठाणे शहरात शिवसैनिकांना त्रास दिला जात आहे. शाखा बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ४१ वर्षांपूर्वी या शाखांचे उद्घाटन झालेले आहे. या शाखा बांधणारे शिवसैनिक दिवंगत झालेले आहेत. मात्र या शाखा बळकावण्यासाठी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात आहे. आमदारांची अपात्रता आणि निवडणूक आयोगाचा निकाल न्यायप्रविष्ठ असतानाही शाखा बळकावण्याचे काम केले जात आहे. याच कारणामुळे आम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी खबरदारी घेण्याची आम्ही मागणी केली आहे,” असे विचारे यांनी सांगितले आहे.

पत्रामध्ये नेमकं काय आहे?

राजन विचारे यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात शिंदे गटाला समज द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘शिवसेनेच्या स्थापनेपासून ५६ वर्षांमध्ये महाराष्ट्रात शिवसेनेच्या अनेक शाखा व कार्यालये सुरू आहेत. त्यापैकी ठाण्यामध्येही गेल्या अनेक वर्षांपासून विविध भागांमध्ये शिवसेनेची कार्यालये (शाखा) कार्यान्वित आहेत. त्यापैकी काही शाखांची मालकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे तर काही पक्ष कार्यालायची मालकी खाजगी मालमत्ताधारकांकडे आहे. सदर मालमत्तेचा ताबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. असे असताना शिंदे गटाकडून सातत्याने जोर जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करून पक्ष कार्यालये (शाखा) बळकावण्यात आली आहेत,’ असा दावा या पत्रात करण्यात आला आहे.

शाखा बळकावण्याचे गुंडांमार्फत षडयंत्र?

‘पक्षाशी द्रोह करण्याऱ्या गटाच्या पात्र अपात्रतेचा व नुकताच निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या जुन्या शाखा बळकावण्याचे षडयंत्र गुंडांमार्फत रचले जात आहेत. समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शिंदे गटाला पोलीस यंत्रणेने प्रोत्साहन न देता योग्य ती समज द्यावी. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शिंदे गटाची व पोलीस खात्याची राहील,’ असा इशाराही या पत्रामध्ये देण्यात आला आहे.