लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत हिंमत असेल तर राजिनामा द्या, तुमच्या मतदार संघातून निवडणूक लढविण्यास तयार आहे असा इशारा दिला होता. आदित्य यांच्या या अव्हानानंतर शिंदे यांच्या नेतत्त्वाखालील युवासेनेने ठाण्यात फलक उभारून आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे. ‘ठाण्यामध्ये नका भाषण झाडू, युवासेनेने ठरविले तर वरळीत येऊन पाडू’ असा फलक शहरातील चौकात बसविले आहेत. हा फलक लक्षवेधून घेत आहेत.

आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील चार शाखांना भेटी दिल्या होत्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यात येऊन आव्हान दिले होते. हिमंत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे असे म्हटले होते. यानंतर शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील युवासेनेने ठाण्यातील एका चौकात फलक बसविले आहे. ‘ठाण्यामध्ये नका भाषण झाडू, युवासेनेने ठरविले तर वरळीत येऊन पाडू’ असे या फलकावर म्हटले आहे.

आणखी वाचा-अपूर्ण होम प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनाचा घाट; बदलापुरात विरोधी पक्ष आक्रमक, उद्घाटनाला विरोध

शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील युवसेनेचा राज्यस्तरीय मेळावा शनिवारी ठाण्यातील रेमंड मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर युवासेनेकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Story img Loader