ठाणे – भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक माजी फलंदाज विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव उपचारासाठी भिवंडी येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच आकृती रुग्णालयाच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही कमी राहणार नाही याची काळजी घ्या अशी विनंती केली. तर डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून कांबळी यांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
ही मदत पूढील आठवड्यात करण्यात येणार असून येणाऱ्या काळात त्यांना अजून मदत करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याचे मंगेश चिवटे यांनी सांगितले. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. १५ दिवसांपूर्वी भिवंडी येथील आकृती रुग्णालयातील डाॅक्टरांचे पथक वांद्रे येथील कांबळी यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कांबळी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शक्य झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, कांबळी यांच्या कुटुंबियांनी शनिवारी त्यांना भिवंडी आकृती रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा >>> कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात गृहरक्षकाला न्यायबंद्याची मारहाण
रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक कांबळी यांच्यावर उपचार करत आहेत. कांबळी हे डाॅक्टर आणि माध्यमांसोबत संवादही साधताना दिसतात. कांबळी यांना चालताना त्रास होत होता. तसेच इतरही अनेक आजार त्यांना होते. वैद्यकीय तपासणीमध्ये कांबळी यांच्या मेंदूमध्ये गुठळ्या झाल्या असून त्यांना मूत्र संसर्ग असल्याचे डाॅ. विवेक द्विवेदी यांनी सांगितले. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्यावर केले जाणार उपचार मोफत आहेत असेही त्यांनी सांगितले. कांबळी यांच्या प्रकृतीची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यावर हल्ला करणारे दोन जण अटकेत
तसेच आकृती रुग्णालयाच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही बाब कमी राहणार नाही याची काळजी घ्या अशी विनंती केली. तर डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून कांबळी कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत पूढील आठवड्यात करण्यात येणार असून येणाऱ्या काळात त्यांना अजून मदत करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याचे मंगेश चिवटे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या मदतीबद्दल क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांना भेटण्याची विनंती केली. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची भेट घेऊन कांबळी परिवाराला मदत करणार आहेत.