लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकृती ठीक नसल्याच्या कारणामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्या सातारा येथील दरेगावी गेले होते. रविवारी सायंकाळी ते पुन्हा ठाण्यात परतले. त्यांच्या भेटीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. शिंदे गावी निघून गेल्याने महायुतीच्या सत्तास्थापनेच्या बैठकांच्या फेऱ्या होत नव्हत्या.

आणखी वाचा-मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा राजिनामा

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी निघून गेले होते. त्यामुळे महायुतीतील चर्चेच्या फेऱ्या होऊ शकल्या नव्हत्या. रविवारी सायंकाळी ते हेलिकॉप्टरने पुन्हा ठाण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे हे ठाण्यात परतल्याने आता राज्याच्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. तसेच महायुतीच्या बैठकांच्या फेऱ्या देखील सुरू होण्याची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde returns to thane after rest mrj