कल्याण-कल्याण ते टिटवाला रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गुरुवारी दुपारी एका प्रवाशाने धावत्या लोकलमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला माल वाहतूक डब्यात बेदम मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या राजुल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल

बबन हांडे देशमुख (६५) असे मयत प्रवाशाचे नाव आहे. ते आंबिवली येथे राहतात. ते काल दुपारी काही कामानिमित्त कल्याण येथे आले होते. काम आटोपल्यानंतर ते कल्याण रेल्वे स्थानकातून टिटवाळा लोकलने घरी चालले होते. सामान्य डब्यात गर्दी असल्याने बबन लोकल मधील मालवाहतूक डब्यात चढले. लोकलमध्ये चढत असताना त्यांचा धक्का एका प्रवाशाला लागला. याबद्दल बबन यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या प्रवाशाने बबन यांना मालवाहतूक डब्यात बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. लोकल धावती असल्याने इतर डब्यातील प्रवाशांना माल वाहतूक डब्यात काय चालले हे कळले नाही. बेदम मारहाण झाल्याने बबन यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा >>> ठाणे परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, विकासकामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याची सूचना

मारेकरी टिटवाळा स्थानक येण्यापूर्वीच लोकलमधून उतरुन पळून गेला. टिटवाळा रेल्वे स्थानकात माल वाहू डब्यात एक व्यक्ति मरण पावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लोहमार्ग पोलिसांनी बबन यांचा मृतदेह ताब्यात घेऊन रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Story img Loader