वैतरणा तीरावरील श्रीक्षेत्र नागनाथ येथे रविवारी खानिवली परिसरातील समस्त जातीधर्मातील पंच्याहत्तरी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ज्यांनी आपापले व्यवसाय करून हा परिसर घडविला, परिसर सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम होता. दीपक पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. या मेळाव्यात खानिवली परिसरातील ६५ वयोवृध्दांनी हजेरी लावली होती. सकाळी दहा वाजता श्रीभैरवनाथांच्या दर्शनाने सुरू झालेल्या या मेळाव्यात चहापान, स्वरूची भोजन, गप्पाटप्पा, अनुभवकथन, भजन आदी उपक्रम राबविण्यात आले. माजी सभापती रत्नाकर पाटील, कुस्तीगीर पद्मगुरूजी(सावंत), युसुफ फक्की , दुंदू पाटील, हरिभाऊ पाटील, प्रा. परशुराम सावंत, ह.भ.प लडकू पाटील व समाजसेवक रघुनाथ पाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा