डोंबिवली पूर्वेतील कस्तुरी प्लाझा संकुला जवळील टाटा पाॅवर मार्गिकेतून पायी जात असताना भरधाव वेगात असलेल्या एका रिक्षा चालकाने सोमवारी संध्याकाळी एका ७६ वर्षाच्या आजींना जोरदार धडक दिली. आजींच्या पायाचे हाड मोडले आहे. आजींना मदत करण्याऐवजी रिक्षा चालक घटनास्थळा वरुन पळून गेला. रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षा चालका विरुध्द आजींनी तक्रार केली आहे. कस्तुरी प्लाझा संकुल भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी पळून गेलेल्या रिक्षा चालकाचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा- कल्याण- डोंबिवली पालिका उभारणार स्वत:ची जल तपासणी प्रयोगशाळा

अनुपमा पाटकर (७६) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या नांदिवली भागात राहतात. अनुपमा पाटकर सोमवारी संध्याकाळी कस्तुरी प्लाझा जवळील टाटा मार्गिकेतून पायी चालल्या होत्या. रस्त्याच्या एका बाजूने चालत असताना सुध्दा पाठीमागून भरधाव वेगात एका रिक्षाचालक आला. त्याने अनुपमा यांना जोरदार रिक्षेची ठोकर दिली. त्या जमिनीवर पडल्या. त्यांच्या पायाच्या घोट्याचे हाड मोडले आहे. आपल्या हातून अपघात घडला आहे म्हणून आजींना मदत करण्याऐवजी रिक्षा चालक घटनास्थळावरुन पळून गेला.

Story img Loader