कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या १ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रचाराची शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सांगता झाली. राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना-भाजपचा प्रचार परस्परविरोधातील आरोप-प्रत्यारोपांभोवती फिरत राहिला. तर, मनसेने नाशिकच्या विकास कामांचे सादरीकरण करून सत्ताधाऱयांवर कडी करण्याचा प्रयत्न केला.  काँग्रेस-राष्ट्रवादी मात्र प्रचारात कुठेच दिसून आली नाही. प्रचारतोफा थंडावल्यानंतर आता मतदानादिवशी मतदार कोणाच्या बाजून कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तर, प्रतिस्पर्धी उमेदवारांचे कार्यकर्ते फोडणे, मतांसाठी पैसेवाटप असे गैरप्रकार मतदानाच्या दिवशी सकाळपर्यंत सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, कल्याण-डोंबिवलीमध्ये १२२ जागांसाठी एकूण ७४३ उमेदावर रिंगणात आहेत. तर कोल्हापूर महापालिकेच्या ८१ जागांवर २०० हून अधिक उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. दोन्ही ठिकाणी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजपर्यंत मतदान होईल तर, दुसऱयाच दिवशी म्हणजे २ नोव्हेंबरला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल.