कुळगाव – बदलापूर नगरपालिकेची एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होत असून या निवडणूकीसाठी २१ जानेवारी रोजी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली. परंतु या सोडतीवर शहरातील संबंधितांकडून जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज करून एकूण सोळा हरकती घेण्यात आल्या आहेत. यापैकी साकिब गोरे यांची हरकत मान्य करून निवडणूक आयोगाने नगरपालिका हद्दीतील काही प्रभागांची फेरसोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.
गोरे यांनी प्रभाग क्रमांक २१ येथे महिलांचा मागास वर्ग आरक्षण पडल्याने हरकत घेतली होती. कारण यापूर्वी सोडत होताना नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी पडलेल्या महिला आरक्षणाचे ठिकाणी पुन्हा नव्याने महिला आरक्षण पडणार नाही, असा अध्यादेश काढला होता. प्रत्यक्षात आरक्षण सोडत होताना या पूर्वी महिलांसाठी आरक्षित असलेला प्रभाग क्रमांक २१ महिलांसाठी राखीव झाल्याने प्रशासनाची कामकाजातील चूक लक्षात आली. त्यामुळे आता झालेल्या फेरसोडतीत या प्रभागामधील आरक्षण बदलून यापूर्वी महिलांसाठी आरक्षित नसलेले प्रभाग क्रमांक ३४ आणि ३६ यावर सोडत झाली. यात प्रभाग क्रमांक ३४ महिला मागासवर्गासाठी सोडतीत आरक्षित झाला. आरक्षण बदलल्याने प्रभाग क्रमांक २१ नागरिकांचा खुल्या मागासवर्गासाठी आरक्षित झाला, असे निवडणूक निर्णय अधिकारी व भिवंडीचे प्रातांधिकारी संजय सरवदे यांनी सोडतीच्या माध्यमातून जाहिर केले. तसेच २१ जानेवारीला झालेल्या सोडतीमध्ये अजून एक गडबड निदर्शनास आली असून हा प्रभाग आरक्षित होताना घेण्यात आलेली प्रक्रिया आणि प्रत्यक्ष सोडत होताना काढलेली चित्रफित यामध्ये तफावत आहे.
या सोडतीमध्ये प्रभाग क्र मांक २१ हा निवडणूक आयोगाच्या १४ जानेवारी २०१५ च्या अध्यादेशानुसार महिला आरक्षणातून वगळण्यात यावा, असे निवडणूक आयोगाचे निर्देशांचे वाचन करून सदर प्रभाग आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेतून वगळण्यात आल्याचे जाहीर केल्याचे या चित्रफितीत स्पष्ट दिसत आहे. पुढील सोडतीत या प्रभागाची चिठ्ठी टाकून प्रभाग पुन्हा आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेत आल्याने या प्रभागाची चिठ्ठी सोडतीत पुन्हा कशी आली यावरच हरकत घेण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा