डोंबिवलीतील फडके रोडवरील श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी प्रवचनकार अलका मुतालिक यांची शुक्रवारी निवड करण्यात आली. काही दिवसापूर्वीच गणेश मंदिर संस्थानची आगामी पाच वर्षासाठीची कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणूक झाली होती. कार्यकारिणीत एकूण ११ सदस्य आहेत. ही कार्यकारिणी २०२७ पर्यंत कार्यरत राहणार आहे.उपाध्यक्ष पदी सनदी लेखापाल सुहास आंबेकर, सचिव पदी प्रवीण दुधे, कोषाध्यक्ष अजय कानिटकर, सहसचिव डाॅ. उत्कर्ष भिंगारे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीमध्ये वैद्य विनय वेलणकर, राहुल दामले,श्रीपाद कुळकर्णी, मंदार हळबे, आनंद धोत्रे, गौरु कुंटे यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला; एकाला अटक

प्रवचनकार अलका मुतालिक ३५ वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. डोंबिवलीतील मातोश्री सरलाबाई माध्यमिक विद्यालयात त्या अनेक वर्ष शिक्षिका होत्या. सज्जनगड येथील समर्थ विद्यापीठात त्या सल्लागार आहेत. समर्थ विद्यापीठातील प्राथमिक, माध्यमिक ते विद्यावाचस्पतीपर्यंत अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यात त्या महत्वाची भूमिका बजावतात. अध्यात्मिक क्षेत्रात अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात. हिंदू धर्म ग्रंथांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. श्रीमद भागवद ग्रंथाच्या कथाकार म्हणून त्या ओळखल्या जातात. देशाच्या विविध भागात त्या निरुपणासाठी जातात. श्री गणेश मंदिर संस्थानच्या उपक्रमात त्या अनेक वर्षापासून सहभागी होत आहेत. काही ग्रंथांचे भाषांतर, रुपांतरण करण्याचे काम त्यांनी केले आहे.

हेही वाचा >>>कोपरी पुलाच्या कामामुळे ठाण्यात वाहतूक बदल

‘श्री गणेश मंदिराचे पुढील वर्षापासून शतकोत्तर महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. या महोत्सवाच्या काळात आपणास अध्यक्षपद मिळाले हे आपले भाग्य समजते. येत्या पाच वर्षाच्या काळात वैद्य विनय वेलणकर आणि कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली अनेक धार्मिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, समाजपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस आहे. समाजाच्या सर्व घटकांना मंदिर उपक्रमात सहभागी करुन अनेक शालोपयोगी उपक्रम सुरू करण्याचा विचार आहे.’, अशी प्रतिक्रिया अध्यक्षा अलका मुतालिक यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election of alka mutalik as president of ganesh temple sansthan trustee dombivli amy
Show comments