कल्याण – ग्राहकांना वीज देयकाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सुट्टीच्या दिवशीही वीज देयक भरणा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय महावितरणच्या कल्याण परिमंडलाने घेतला आहे. कल्याण परिमंडलांतर्गत सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे शनिवार आणि रविवार (२९ ते ३० जून) या सुटीच्या दिवशी सुरु राहतील. उपलब्ध सुविधेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी आपल्या चालू वीज देयकासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांनी केले आहे.

वीज देयक थकबाकी कमी करण्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम कल्याण परिमंडलात सुरू आहे. सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरू राहणार असून संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. अधिकृत वीज देयक भरणा केंद्रासह महावितरणचे मोबाईल ॲप, http://www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या विजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधाही ग्राहकांना उपलब्ध आहे.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Thane Citizens, Thane Citizens Protest Aggressive Bike Towing, Police Seek Rule Adherence, thane news,
टोईंग कारवाईच्या त्रासामुळे ठाणेकर हैराण ठाण्यातील सुजान नागरिकांचे टोईंगविरोधात आंदोलन, जागोजागी जनजागृती
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
UddhavThackeray
भविष्यात एनडीएबरोबर जाणार का? उद्धव ठाकरेंचं मोजक्या शब्दांत उत्तर; म्हणाले, “समजा मला जायचं…”
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!

हेही वाचा >>>ठाणे : पावसाळा सुरु होताच प्रवाशांचे हाल सुरु; शहरात रिक्षांचा तुटवडा

ग्राहकांनी अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.