दाट लोकवस्तीच्या दिवा शहरामध्ये नवी यंत्रणा उभी करण्यात महावितरण अपयशी ठरल्याचा सर्वाधिक फटका येथील रहिवाशांना सहन करावा लागतो. उन्हाळा असो किंवा पावसाळा, वर्षांच्या कोणत्याही ऋतूमध्ये दिव्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले असून आठवडय़ातून ५० तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार गेल्या महिन्यात या परिसरात घडला होता. नव्या यंत्रणा उभारण्यात आवश्यक निधी असूनही ठेकेदार उपलब्ध होत नसल्यामुळे दिव्यातील अंधार अधिक गडद होऊ लागला आहे.

महावितरणच्या वतीने कालबाह्य़ झालेल्या यंत्रणा नव्याने उभारण्यास सुरुवात झाल्यानंतर ठाणे, कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या शहरांमध्ये सर्वात पहिल्यांदा या यंत्रणा कार्यान्वित झाल्या. त्यानंतर दिवा शहरात नवी यंत्रणा उभारण्यासाठी महावितरणने तयारी सुरू केल्यानंतर या भागात अडचणींची जंत्रीच त्यांच्यासमोर उभी लागली. दिव्यातील विजेचा लपंडाव दूर व्हावा यासाठी महावितरणने या पट्टय़ात वीज वितरण व्यवस्थेच्या नूतनीकरणासाठी सुमारे ३७ कोटी रुपयांची निविदा काढली आहे, मात्र भूमिगत वाहिन्या टाकणे तसेच उपकेंद्रांच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेवर स्थानिकांच्या असहकाराला सामोरे जावे लागत असल्याने ही कामे करण्यास  कुणीही ठेकेदार पुढे येण्यास तयारच होत नाहीत. विशेष म्हणजे एका ठेकेदाराने या कामास तयारी दर्शवल्यानंतर उपकेंद्राच्या जागेवरून झालेल्या वादामुळे या ठेकेदाराने काम अर्धवट सोडून पळ काढला. त्यामुळे दिव्यातील नव्या वीजवाहिन्यांची कामे रखडली आहेत. विशेष म्हणजे नव्याने निविदा दाखल केल्यानंतर त्यालाही आता प्रतिसाद मिळणे कठीण होऊन बसल्याने महावितरण चिंतेत आहे. दिव्यातील स्थानिकांचा उपद्रव यास मुख्य कारण असून वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणच्या कार्यालयाची मोडतोड करणे, अधिकाऱ्यांना मारहाण करणे यामध्ये येथील रहिवासी धन्यता मानतात. त्यामुळे या भागाकडे महावितरणने नेहमीच दुर्लक्ष केले असून त्याचा सर्वसामान्यांना मोठा फटका सहन करावा लागतो. दिव्यामध्ये लावण्यासाठी आणलेले ट्रान्सफॉर्मर केवळ जागेअभावी पडून आहेत, असे येथील महावितरणचे अधिकारी सांगतात.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
Important research Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University shows that mosquitoes are repelled by yellow light of LED
डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”

दिव्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा सतत लपंडाव सुरू आहे. शुक्रवारपासून खंडित झालेला विजेचा पुरवठा सोमवापर्यंत सुरळीत होत नाही. जुनाट वीजवाहिन्या, वाकलेले विजेचे खांब, अपुरे जुने ट्रान्सफार्मर, वीज उपकेंद्राच्या जागांवर रहिवाशांचे अतिक्रमण, भूमिगत वाहिन्यांसाठी जागेची कमतरता या सगळ्या अडचणींमुळे दिव्यातील महावितरणच्या यंत्रणेला ग्रहण लागले आहे. त्याचा फटका येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर दिवा परिसरात वारंवार विजेचा पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले होते. दररोज १२ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिला आहे. महावितरणने वीजवाहिनी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्यापही काही भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार कायम आहे. दिव्यातील वीज प्रश्न सोडवण्यात महावितरण हतबल असून स्थानिकांपुढेही कोणताच दुसरा पर्याय नसल्याने दिव्यात अंधार कायम आहे.