महावितरणाकडून एकीकडे वीज बिलांची वसुली आग्रही पद्धतीने केली जात असतानाच वीज चोरी करणाऱ्यांचाही छडा लावला जातो आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या दोन दिवसात उल्हासनगरात वीज चोरी करणाऱ्याविरूद्ध चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात चार प्रकरणांमध्ये तब्बल ३ हजार ७४० युनीट आणि ५७ हजार रूपयांची वीज चोरी उघड करण्यात महावितरणाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. यात घरगुती वीज ग्राहकांचा समावेश आहे.

महावितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्याह काही दिवसात वीज बिल भरणा करण्यासाठी सातत्याने ग्राहकांना आवाहन केले जाते आहे. त्यामुळे विविध भागात विजबिलांचा भरणा वाढला असल्याचे दिसून येते आहे. यंदाच्या उन्हाळ्यात महावितरणाने ठाणे जिल्ह्यातील वीज बिलांचा भरणा कमी असलेल्या भागांचा भारनियमाच्या यादीत समावेश केला होता. उल्हासनगर शहराचा त्यात समावेश नव्हता. त्यामुळे उल्हासनगर शहरातील बिलांचा भरणा सुरळीत होत असल्याचे दिसून आले होते. एकीकडे बिल भरणा वाढवण्यासाठी आग्रही असलेल्या महावितरणाने आता वीज चोरांचाही बंदोबस्त करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यात वीज चोरांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. गेल्या दोन दिवसात उल्हासनगरच्या विविध भागात महावितरणाच्या अभियंत्यांनी चार ठिकाणी विजेची चोरी उघडकीस आणली आहे. यात उल्हासनगर कॅम्प तीन भागात फॉलोवर लाईन परिरात तब्बल १ हजार ७४६ युनीट आणि २३ हजार ४१० रूपयांची वीज चरी पकडली आहे. याप्रकरणी घरमावती पर्चा यांच्याविरूद्ध विद्युत कायद्याखाली मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तर कॅम्प पाच भागातील गायकवाडपाडा येथे हरि वाघमारे यांच्या घरात ७२८ युनीट आणि १५ हजार ९१०रूपयांची तर महात्मा फुले नगर भागात चंद्रभाण हिवराले यांच्या घरी १ हजा २६६ युनीट अर्थात १७ हजार ९६०रूपयांची वीज चोरी पकडली आहे. या चारही गुन्ह्यांमध्ये एकूण ३ हजार ७४० युनीटची चोरी झाली असून महावितरणाचे ५७ हजार २८० रूपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका महावितरणातर्फे ठेवण्यात आला आहे.

Story img Loader