कल्याण येथील कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या दिशेने शनिवारी दुपारी न्यायालयीन कामकाज सुरू असताना कटघऱ्यामधील आरोपीने किरकोळ कारणावरून पायातील चप्पल भिरकावली होती. तसेच, एक बंदूकधारी खाजगी सुरक्षा रक्षक न्यायालय आवारात फिरत असल्याची एक दृश्य ध्वनीचित्रफित समाज माध्यमावर सामायिक झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या दोन्ही प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत न्यायालयीन कर्तव्यावरील अकरा पोलिसांना गुरुवारी सेवेतून निलंबित केले. त्यात एका पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटना प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा >>>अल्पवयीन मुलीच्या हात्येप्रकारण जलद गती न्यायालयात चालणार
खडकपाडा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील इसम किरण भरम यांना शनिवारी दुपारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. जी. वाघमारे यांच्या समोर पोलिसांनी हजर केले होते. इसम किरण यांनी न्यायालयाला टेबल बदल करण्याची मागणी केली. न्यायालयाने किरण यांना तुम्ही तुमच्या वकिलामार्फत तसा अर्ज द्या, असे सांगितले. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयीन सेवकाने इसमाच्या वकिलाच्या नावाचा पुकारा करून हजर राहण्याचे सूचित केले. इसमाचा वकील न्यायालयात हजर झाला नाही. न्यायालयाने इसमास दुसरा वकील देण्याची सूचना केली आणि याप्रकरणी पुढील तारीख दिली.
यावेळी इसमाने खाली वाकून पायातील चप्पल काढली. ती न्यायाधिश वाघमारे यांच्या दिशेने फेकली. पोलीस किंवा न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कळण्यापूर्वीच इसमाने ही कृती केली. चप्पल न्यायाधिशांच्या समोरील लाकडी मंचकाला लागून बाजुला बसलेल्या कर्मचाऱ्याच्या समोर पडली. चप्पल फेकल्याच्या घटनेनंतर आरोपीच्या सोबत असलेले पोलीस काय करत होते असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
हेही वाचा >>>बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
महात्मा फुले पोलीस ठाण्यात किरण यांच्या विरुध्द पोलिसांना शासकीय कर्तव्य करण्यापासून परावृत्त केल्याचा गु्न्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयातील दुसऱ्या एका प्रकरणात न्यायालयीन कामासाठी आवारात आलेल्या एका व्यक्तीसोबत एक बंदूकधारी खाजगी सुरक्षा रक्षक फिरत असल्याची दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांवर सामायिक झाली होती. न्यायालय आवारात शस्त्र घेऊन फिरण्यास प्रतिबंध असताना बंदूकधारी इसम न्यायालय आवारात आलाच कसा असे प्रश्न वकिलांकडून उपस्थित करण्यात येत होते. याप्रकरणीही गुन्हा दाखल झाला होता.
या दोन्ही प्रकरणांची उपयुक्त झेंडे यांच्या आदेशावरून चौकशी करण्यात आली. या चौकशीत न्यायालयीन कर्तव्यावर असलेले पोलीस कर्तव्यात कसूरपणा, निष्काळजीपणा करत असल्याचे स्पष्ट झाल्याने उपायुक्त झेंडे यांनी एकूण ११ पोलिसांना गुरुवारी निलंबित केले.
न्यायालयीन आवारात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्तव्यात कसूरपणा करत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. याप्रकरणी ११ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.- अतुल झेंडे, पोलीस उपयुक्त, कल्याण