लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : कोलशेत येथे कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
injured young man share experience of dumper accident
पुणे : अचानक मोठ्या आवाजाने जाग आली आणि…, जखमी तरुणाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
pune dumper crushed people on footpath
पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या तिघांना मद्यधुंद डंपर चालकांने चिरडले, तीन जण ठार तर सहा जण जखमी
Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या

आणखी वाचा-कल्याण-डोंबिवली शहरांतर्गत केडीएमटीच्या बस सुरू करा, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

कोलशेत येथील टीएमटीच्या आगाराजवळ अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची माहिती महापालिकेला मिळाली होती. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी अतिक्रमण विभागात नेमणुकीस असलेले लिपीक प्रवीण तावडे हे पथकासह त्याठिकाणी गेले. त्यावेळेस पथकाने तेथील कृष्णकांत फुलोरे यांना बांधकाम परवानगी बाबत विचारले असता, कागदपत्रे नसल्याचे फुलोरे यांनी सांगितले. त्यामुळे साहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांनी संबंधित बांधकामावर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथक कारवाई करत असताना कृष्णकांत फुलोरे, ओंकार फुलोरे, रेश्मा फुलोरे, गौरी फुलोरे यांनी आरडाओरड करत तावडे यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. याप्रकरणी तावडे यांनी तक्रार दिल्यानंतर कापूरबावडी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader