फडके मैदान, म्हसोबा मैदान भागातील रस्ते काँक्रीटीकरणासाठी आर्थिक तरतूद नसताना या कामाच्या बनावट नस्ती तयार करुन त्या आयुक्तांकडून मंजूर करुन घेण्याचा प्रयत्न गेल्या आठवड्यात झाला. बांधकाम विभागातील ही बनावट नस्ती तयार करण्याची चोरी आयुक्तांनी पकडताच संबंधितांना नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. नोटिसीच्या कार्यवाहीसाठी नस्ती सामान्य प्रशासन विभागातील अधीक्षकांकडून साहाय्यक आयुक्तांकडे गेल्यानंतर आठवडाभर या नस्तींवर कोणतीची कारवाई झाली नाही. त्यानंतर या नस्ती गायब झाल्या. या प्रकरणातील जबाबदारी लिपिक, शिपायाला आयुक्तांनी निलंबित केले आहे. त्यामुळे या नस्तींच्या ताबेदार असलेल्या सामान्य प्रशासन साहाय्यक आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱी, कर्मचारी संघटनेकडून जोर धरत आहे.

आयुक्तांनी नस्ती हाताळणाऱ्या शिपाई लक्ष्मण दिवेकर, लेखा अभियांत्रिकी विभागातील रवींद्र निमगावकर यांना निलंबित केले. या नस्तीच्या ताबेदार आणि नियंत्रक असलेल्या साहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांना प्रशासन का पाठीशी घालत आहे, असे प्रश्न स्थानिक कर्मचारी करत आहेत. एकतर्फी कारवाई करुन आयुक्त स्थानिक कर्मचारी, शासकीय कर्मचारी असा दुजाभाव निर्माण करत आहेत का, असा प्रश्न माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी केला आहे. जे या प्रकरणात दोषी आहेत त्या ठेकेदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. आता आयुक्तांनी या नस्ती प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला बाजुला ठेऊन सामान्य कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, असे बासरे म्हणाले.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

हेही वाचा >>>एकनाथ शिंदे यांच्या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा रद्द; श्री साधकांचे उष्माघाताने निधन झाल्यामुळे कार्यक्रमाच्या निमंत्रकांचा निर्णय

नस्ती गायब प्रकरणातील मुख्य सूत्रधार अधिकारी, बनावट नस्ती तयार करण्यासाठी पुढाकार घेणारे ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी म्युनसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास मंगळवारी आयुक्तांची भेट घेणार होते. आयुक्त मंबई येथे जाणार असल्याने त्यांनी ही भेट बुधवारी ठेवली आहे. या सगळ्या प्रकाराबाबत आपण आयुक्तांना पत्र देणार आहोत, असे अध्यक्ष हरदास यांनी सांगितले.अधिकारी, ठेकेदार, मध्यस्थ यांच्या संगनमतानेच हा प्रकार यापूर्वीपासून सुरू होता. पालिकेच्या तिजोरी लुटण्याचा हा गैरधंदा कायमचा बंद करण्यासाठी आयुक्तांनी या प्रकरणात कणखर भूमिका घ्यावी. संबंधित ठेकेदारावर कारवाई सुरू करावी. सामान्य कर्मचारी वरिष्ठाच्या इशाऱ्यावरुन वागला असेल तर त्याचे निलंबन रद्द करावे, अशी मागणी अध्यक्ष हरदास करणार आहेत.

हेही वाचा >>>ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली; ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांपुढे पाणी टंचाईचे संकट

शहरप्रमुख रवी पाटील यांनीही आयुक्तांनी या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई करावी. शासन सेवेतील कर्मचारी, स्थानिक कर्मचारी असा भेदभाव करू नये, असे म्हटले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, निलंबित लिपिक रवींद्र निमगावकर हे अधिसंख्य पदावरील म्हणजे कंत्राटी कर्मचारी आहेत. अशा कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. असे असताना निमगावकर यांना आयुक्तांनी काढून का टाकले नाही. आयुक्तांनी महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमाच्या कोणत्या कलमाने अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्याला निलंबित केले, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नगररचना विभागात सुरेंद्र टेंगळे हे अधिसंख्य पदावर असून पालिकेतील मोक्याच्या पदावर ते विराजमान आहेत. पालिकेतील महत्वाचा प्रशासकीय कारभार अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या हाती ठेऊन प्रशासन नेमके काय साध्य करत आहे. टेंगळे यांच्या नगररचना विभागातील वावरामुळे सर्वाधिक अनागोंदी या विभागात, शहराच्या नगरनियोजनात होत आहे, असे अनेक विकासक, वास्तुविशारद सांगतात.