लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : मध्य रेल्वे महामार्गावरील महामेगाब्लॉकमुळे कर्जत, कसारा, टिटवाळा, कल्याण, डोंबिवली भागातून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल अर्धा तास उशिराने धावत आहेत. कामावर जाताना आणि सुटल्यावर घरी येताना उगाच रखडपट्टी आणि लोकलमध्ये घामाच्या धारांनी चिंब व्हायला नको म्हणून बहुतांशी नोकरदारांनी घरातून काम करण्याला पसंती दिली आहे. कार्यालयात जाऊन काम करण्याशिवाय गत्यंतर नाही, असा नोकरदार वर्ग प्रवासासाठी बाहेर पडल्याचे चित्र फलाटावर आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई

दोन दिवस अगोदर मध्य रेल्वेने महामेगाब्लॉकची माहिती देऊन प्रवाशांना जागृत केले आहे. तसेच, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, कार्यालयात या असे संदेश देण्यात आले. त्यामुळे सरकारी, खासगी आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासात नाहक त्रास नको म्हणून काहींनी कर्मचाऱ्यांना सुट्टी तर काहींना घरातून कार्यालयीन काम करण्याची मुभा दिली आहे.

आणखी वाचा-ठाणे : अवघ्या आठ तासात रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, फलाटची लांबी नाही तर रुंदी वाढणार

कामाच्या दिवशी सकाळच्या वेळेत प्रवाशांची खचाखच भरणारी टिटवाळा, कल्याण, डोंबिवली आणि इतर रेल्वे स्थानकांवर शुक्रवारी नेहमीप्रमाणे गर्दी नव्हती. लोकल नेहमीच्या विहित वेळेत धावत नव्हत्या. त्यामुळे येणाऱी लोकल पकडून त्या लोकलने मुंबईचा प्रवास नोकरदार वर्ग करत होता. महामेगाब्लॉकमुळे एक दिवस कार्यालयात जाऊन जीवाची आबाळ करून घेण्यापेक्षा अनेकांनी घरातून कामाला पसंती दिली.

रस्ते मार्ग भरले

महामेगाब्लॉकचा धसका घेऊन वाटेत अडकायला नको म्हणून काही नोकरदारांनी ओला, उबर, खासगी वाहनांना पसंती देऊन कार्यालयाची वाट धरणे पसंत केले. काही नोकरदारांनी चार जण मिळून एक खासगी वाहन नोंदणीकृत करून भागीदारी पध्दतीने मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील आपल्या कामाच्या ठिकाणचा प्रवास केला. एकाचवेळी प्रवासी वाहने स्त्यावर आल्याने जागोजागी कोंडीचे चित्र होते. डोंबिवलीतील बहुतांशी प्रवाशांनी म्हणून माणकोली पुलावरून वाहन नेणे पसंत केली. अनेक विद्यार्थी सुट्टीकालीन स्पर्धा परीक्षा, इतर खासगी शिकवणी वर्गासाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबईत जातात. त्या विद्यार्थ्यांचे मेगाब्लॉकमुळे हाल झाले.

केडीएमची सुविधा

कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे कल्याण ते डोंबिवली अशा पाच बस आणि कल्याण ते टिटवाळा अशा मोठ्या दोन बसचे नियोजन केले आहे. प्रवाशांची गर्दी वाढली तर वाढीव पाच बस राखीव ठेवल्या आहेत. पहाटेपासून या बसची प्रवासी सेवा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती केडीएमटी साहाय्यक परिवहन व्यवस्थापक किशोर घाडी यांनी दिली. मध्य रेल्वेने दोन दिवस अगोदरच या महामेगाब्लॉक विषयी जनजागृती केल्याने बहुतांशी नोकरदारांनी घराबाहेर न पडणे पसंत केलेले दिसते किंवा काहींनी घरातून कार्यालयीन काम सुरू केले आहे, त्यामुळे केडीएमटी बसला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद दिसत नाही, असे घाडी यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील प्रवाशांच्या सेवेसाठी कल्याण रेल्वे स्थानक ते डोंबिवली रेल्वे स्थानक, तसेच कल्याण ते टिटवाळा अशी केीएमटी बस सुविधा शुक्रवारी पहाटेपासून सुरू केली आहे. -डॉ. दीपक सावंत, व्यवस्थापक, केडीएमटी.