कल्याण, डोंबिवली शहरातील शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर जुन्या निवृत्ती योजनेच्या मागणीसाठी निदर्शने करुन राज्यव्यापी संपात सहभागी असल्याचे दाखवून दिले. दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने शिक्षकांनी काळ्या फिती लावून संपात सहभाग दाखविला. कल्याण डोंबिवली पालिका कार्यालयांमधील कर्मचारी मात्र कामावर हजर होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>उद्योगमंत्र्यांनी टाकली धाड, टँकर लाॅबीवर केली कारवाई, वाचा कधी आणि कोठे ते….

जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनांनी कार्यालया बाहेर एक तास जमून घोषणाबाजी केली. महिला, पुरुष कर्मचारी या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. महसूल, आरटीओ, पंचायत समिती कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांचा संपामधील सहभाग उत्स्फूर्त होता. कल्याण मधील आरटीओ कार्यालया बाहेर कर्मचाऱ्यांनी कर्मचारी संघटनेचे दीपक गांगुर्डे, तायडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करा, अशा मागण्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होत्या.

हेही वाचा >>>ठाणे: मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरणारे नामचीन गुंड पोलिसांना दिसत नाहीत का?

दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने शिक्षक वर्ग काळ्या फिती लावून शाळांमध्ये हजर झाला आहे, असे शिक्षक कर्मचारी संघटनेचे आर. डी. पाटील यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेनेची संघटना आहे. त्यामुळे संपात सहभागी होऊन आपल्या सरकारला विरोध न करण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला होता. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेतील उपस्थिती नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employees protest for old pension scheme in kalyan dombivli amy