लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : मजूरीचे १० हजार रुपये देण्यास उशीर केल्याने एका मजूराने कारखाना मालकाची हत्या केल्याचा प्रकार भिवंडीतील पूर्णा भागात उघडकीस आला आहे. अमित प्रजापती (२३) असे आरोपीचे नाव असून त्याला नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.

पूर्णा येथील हरिअंत कंपाऊंड परिसरात राकेश सिंह (४५) यांचा महाराष्ट्र पी.व्ही.सी. कंपनी नावाने कारखाना आहे. या कारखान्यात पाईप बनविण्याचे काम केले जाते. कंपनीत चार ते पाच मजूर असून काहीजण मजूरीवर काम करतात. अमित प्रजापती याने या कंपनीत २० दिवस मजूरी केली होती. त्यानंतर त्याने मजूरी करणे बंद केले. बुधवारी अमित हा राकेश यांच्या कार्यालयात आला. त्याने राकेश यांच्याकडे मजूरीची मागणी केली. परंतु राकेश यांनी काही कारणास्तव त्याच्याकडे १० दिवसांची मुदत मागितली. १० दिवसांत पैसे देतो असे आश्वासन त्यांनी अमित याला दिले.

आणखी वाचा-ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन सुरूच

परंतु अमित याने राकेश यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने राकेश यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. अमित याने त्याच्यासोबत एक चाकू आणला होता. या चाकूने त्याने राकेश यांना छातीजवळ दोनवेळा भोसकले. या घटनेत राकेश हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती नारपोली पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अमित याला अटक केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employer killed owner for non payment of wages mrj
Show comments