ठाणे : महापालिका क्षेत्रातील विविध भागात बेकायदा इमारती उभ्या राहत असल्याचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून गाजत असतानाच, त्यापाठोपाठ आता कळवा येथील मफतलाल कंपनीच्या जागेवर भुमाफियांकडून झोपड्या उभारण्यात येत असल्याची बाब पुढे आली आहे. न्यायालयाच्या आदेशाने कंपनीभोवती उभारण्यात आलेली संरक्षक भिंत तोडून या झोपड्या उभ्या राहत असतानाही त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. या प्रकारामुळे गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निष्काषन विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

कळवा येथील मफतलाल कंपनी २७ मे १९८९ मध्ये बंद पडली. या कंपनीत साडेतीन हजार कामगार काम करीत होते. या कामगारांना देणी देण्यात आली नव्हती. त्यामुळे थकीत देणी मिळविण्यासाठी कामगारांनी न्यायालयीन लढाई सुरू केली. न्यायालयाच्या आदेशानुसार ही जमीन विकून कामगारांना थकीत देणी मिळणार होती. मात्र कायद्यावर बोट ठेवत जिल्हा प्रशासनाने कंपनीची जागा ताब्यात घेतली. कंपनीच्या १२३ एकरपैकी ६१ एकरचा भूखंड शासनाच्या ताब्यात होता. उर्वरित जमीन कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात आहे. या जमिनीच्या विक्रीस शासन परवानगी देत नसल्यामुळे कामगारांना थकीत देणी मिळण्यामध्ये मोठा अडसर निर्माण झाला होता. कामगार संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नानंतर सरकारने मफतलाल कंपनीच्या जागेची विक्री करण्यास अखेर संमती दर्शवली होती. दरम्यान, खारेगाव रेल्वे उड्डाण पुल मफतलाल कंपनीची जागेतून गेला असून या जागेपोटी पालिकेने दिलेल्या पैशातून कामगारांची काही देणी देण्यात आली होती. उर्वरित देणी मिळण्यासाठी कामगारांचा न्यायालयीन लढा सुरु आहे. या कंपनीच्या जागेवर अतिक्रमण झाले असून काही जागा मोकळी आहे. या कंपनीच्या जागेवर संरक्षक भिंत बांधण्याचे आदेश उच्च न्यायालयाने काही वर्षांपुर्वी दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेने या जागेभोवती सरंक्षक भिंत उभारली आहे. या संरक्षक भिंतीमुळे बेकायदा झोपड्यांच्या बांधकामाला पायबंद बसेल अशी शक्यता वर्तविली जात असतानाच, भुमाफियांनी आता संरक्षक भिंत तोडून याठिकाणी झोपड्यांची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे. शहरात उभ्या राहत असलेल्या बेकायदा इमारतींवर कारवाई होत नसल्याच्या मुद्द्यावरून पालिकेच्या अतिक्रमण विभागावर टिका होत असतानाच, आता मफतलाल कंपनीच्या जागेवर भुमाफियांकडून उभारण्यात येत असलेल्या बेकायदा झोपड्यांकडेही पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
Public sector recruitment process, marks, transparency,
सार्वजनिक क्षेत्रातील भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक, गुण रोखून धरणे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारे, उच्च न्यायालयाची टिप्पणी
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!
Action against those who lure voters in Malegaon
मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई

हेही वाचा… वाड्याजवळ कंटेनर व बसमध्ये अपघात, २० प्रवाशांसह कंटेनर चालक जखमी

हेही वाचा… श्रमिक जनता संघाचे ५७ वे राष्ट्रीय अधिवेशन ठाण्यात 

अन्यथा आम्हांला कायदा हातात घ्यावा लागेल

कळव्यामधील मफतलाल कंपनीची जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी न्यायालयाने सिमारेषा आखून दिलेली असतानाही तेथिल अर्धाअधिक भाग हा झोपडपट्टी वासीयांनी व्यापला आहे. पण, उर्वरीत भाग सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून न्यायालयाने संरक्षक भिंत उभारण्यास सांगितले होते. आतामात्र हिंमत इतकी वाढली आहे की, स्वाती पाटील व कंचन सिंग यांनी हे संरक्षक भिंत तोडून त्या ठिकाणी ५०० अनधिकृत झोपड्या बांधण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांना अडवायला देखिल कोणी नाही. सुरक्षारक्षक गेला तर ते अंगावर येतात. म्हणजे जंगलराजचे स्वरुप त्या जागेला प्राप्त झाले आहे. हि बाब ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.पी. थोरात यांच्या देखील कानावर टाकली आहे. याला वेळीच आवर घातला नाही, तर त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जर तसे झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासन आणि ठाणे महापालिकेची असेल, असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. महापालिका प्रशासन जर इतकी निष्काळजीपणाने काम करीत असेल तर मग ठाण्याला अतिक्रमण विभागाची गरजच काय ? सगळीकडे अनधिकृत बांधकामे चालू आहेत. झोपडपट्टीदादा जमिनी बळकावत आहेत आणि महापालिकेचे स्थानिक सहाय्यक आयुक्त हे पैसे खाण्यात मग्न आहेत. ही परिस्थिती फार दुर्देवी आहे. याकडे वेळीच लक्ष द्या. अन्यथा आम्हांला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.