तिवरांच्या झाडांचीही कत्तल; नागरिकांच्या सतर्कतेमुळे भूमाफियांचा डाव उधळला
वसई : सध्या टाळेबंदीचा कालावधी सुरू आहे. या टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन वसईतील गिरीज रानगाव येथे भूमाफियांनी सरकारी पाणथळ जागेवर अतिक्रमण करून पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद केले आहेत तर, दुसरीकडे मोठय़ा प्रमाणात तिवरांच्या झाडांची कत्तल होऊ लागली आहे. मंगळवारी रानगाव येथील जागरूक नागरिकांनी अतिक्रमण सुरू असताना भूमाफियांना रंगेहात पडकून डाव उधळून लावला आहे.
करोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठीच्या विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात प्रशासन व्यग्र आहे. अशातच मागील काही दिवसांपासून भूमाफियांनी वसईच्या गिरीज रानगाव येथील सव्र्हे क्रमांक १४२ या सरकारी जमिनीवरील तिवरांच्या झाडांची कत्तल करून त्यावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. करण्यात येत असलेले अतिक्रमण हे पाणथळ जागेत येत असल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याने याविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
याआधी सुद्धा या ठिकाणी तिवरांची होत असलेली कत्तल व अनधिकृत बांधकामे याबद्दल जिल्हाधिकारी व तालुका प्रशासन यांच्याकडे तक्रार करण्यात आली असल्याचे पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी सांगितले आहे. मात्र तरीही या ठिकाणी छुप्या पद्धतीने अतिक्रमण करण्याचे काम सुरूच होते. भूमाफियांनी जेसीबी लावून मोठय़ा प्रमाणात तीवर तोडून तसेच बेकायदा उत्खनन करून पाण्याचे नैसर्गिक मार्गच बंद करून टाकले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात पाणी आजूबाजूला असलेल्या खेडय़ापाडय़ात घुसून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत पर्यावरण संवर्धन समितीने केलेल्या तक्रारीनुसार वसईच्या तहसीलदारांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना जागेवर पाठवून भूमाफियांविरोधात कारवाई केली असल्याचे वर्तक यांनी सांगितले.
टाळेबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन करून गिरीज रानगाव येथील सरकारी पाणथळ जागेवर भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठय़ा अडचणी निर्माण होतील यासाठी शासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी.
– समीर वर्तक, पर्यावरण संवर्धन समिती