उल्हासनगरः रस्ते रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या ४० अतिक्रमणांवर उल्हासनगर महापालिकेने नुकतीच कारवाई करत अतिक्रमणे हटवली. प्रभाग क्रमांक एक आणि चार येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे या दोन्ही भागात रस्ते रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
उल्हासनगर शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामांतील सर्वात मोठा अडथळा येथे असलेले अतिक्रमणे ठरली आहेत. या अतिक्रमणांमुळे अनेक रस्त्यांची कामे रखडली आहेत. कल्याण बदलापूर राज्यमार्ग हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामापूर्वी रस्त्याच्या जागेत असणारी अतिक्रमणे काढण्यावर पालिकेने भर दिल्याचे दिसून आले आहे.
नुकतीच उल्हासनगर शहरातील दोन प्रभाग समिती कार्यक्रमात उल्हासनगर महापाालिकेच्या वतीने अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात आली. प्रभाग समिती एक येथील पोलीस ठाण्याजवळील भाजी मंडई आणि प्रभाग समिती चार येथील स्वामी शांतीप्रकाश शाळा ते दुर्गा देवी पाडा या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार होते. त्यासाठी जागेची आवश्यकता होती. अखेर दोन्ही रस्त्यांवरच्या ४० अतिक्रमणांना हटवण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे. त्यामुळे, या रस्त्यांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्यांचे काम सुरू झाल्याने या भागातील वाहतूक कोंडी फुटण्यास सुरुवात होणार आहे. तसेच शहरातील ज्या ज्या भागांत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या रस्त्यांवरचे अतिक्रमणही लवकरच हटवले जाणार असल्याची माहिती शिंपी यांनी दिली आहे.