ठाणे – ठाणे शहरात ‘डॉग्ज वर्ल्ड इंडिया’ या संस्थेने दोन दिवस आयोजित केलेल्या ‘ठाणे पेट फेस्टिव्हल’ला १० ते १२ हजार प्राणीप्रेमींनी भेट दिल्या, तर पालकांसोबत ८०० हून अधिक पाळीव प्राणी फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. या फेस्टिव्हलमध्ये पाळीव प्राण्यांच्या विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिराबरोबरच श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा, श्वान आणि मांजरींचा फॅशन शो असे कार्यक्रम झाले. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने श्वान, मांजर, पक्षी आणि माशांच्या विविध प्रजातीही ठाणेकरांना पाहता आल्या.

ठाणे शहरात ‘डॉग्ज वर्ल्ड इंडिया’ या संस्थेने खेवरा सर्कल परिसरात ‘ठाणे पेट फेस्टिव्हल’ आयोजित केले होता. शनिवार आणि रविवार या दिवशी हा फेस्टिव्हल पार पडला असून, या फेस्टिव्हलला प्राणीप्रेमींनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या दोन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये पाळीव प्राण्यांची विनामुल्य आरोग्य तपासणी करण्यात आली. श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. श्वान आणि मांजरींचा फॅशन वाॅक, एक्झाॅटिक ब्रीड शो, खेवरा सर्कल ते कार्यक्रम स्थळापर्यंत पेट रन, ट्विन वाॅक, ब्रीड फेस्टीवल, असे कार्यक्रमही पार पडले. या फेस्टिव्हलमध्ये ८०० हून अधिक पाळीव प्राणी त्यांच्या पालकांसोबत सहभागी झाले होते. या फेस्टीव्हलला १० ते १२ हजार प्राणीप्रेमींनी भेट दिल्या. या प्राणीप्रेमींनी विविध खेळाच्या स्पर्धेच्या माध्यमातून श्वानांची चपळता, चालाखी आणि आज्ञाधारकता अनुभवली. गणितविषय असलेल्या ज्ञानाचे कौशल्य एका श्वानाने दाखवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. प्राणीप्रेमी दोन अंक सांगून त्यांची बेरीज श्वानाला विचारायचे. त्यानंतर बेरजेचा एकूण आकडा जो असेल तितक्यावेळा तो श्वान भुंकायचा. श्वानाच्या या कौशल्याचे प्राणीप्रेमींकडून कौतुक होत होते.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
A video of a leopard entering the garden of a house in Mount Abu
थेट घरात घुसला बिबट्या अन् बागेत फिरणाऱ्या कुत्र्यावर मारली झडप; थरारक घटनेचा Video Viral
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
stray dogs dead
कांदिवलीमध्ये १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO

हेही वाचा – डोंबिवलीतील आयरे, कोपर पूर्व हरितपट्ट्यावर कारवाईचे आयुक्तांचे आदेश; बेकायदा इमारतीत रहिवासी घुसविण्याचा प्रयत्न

हेही वाचा – ठाण्यात पाणी पुरवठा पूर्ववत, पण टंचाई मात्र कायम; ठाणे, घोडबंदर, कोपरी, वागळे इस्टेट भागातून पाणी टंचाईच्या तक्रारी

श्वानांचे ३६० डीग्री फोटो शूटची आणि सेल्फीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. याठिकाणीही श्वानांचे फोटो काढण्यासाठी त्यांच्या पालकांनी मोठी गर्दी केली होती. श्वानांच्या प्रजाती आणि श्वानांचा वयोवृद्ध, गतीमंद आणि रुग्णांकरीता होणारा थेरेपीसाठी वापर याविषयी तज्ज्ञांमार्फत माहिती देण्यात आली. प्रशिक्षित श्वानांचे संचलन, सैन्य दलातील श्वान प्रशिक्षकांनीही फेस्टिव्हलला उपस्थिती लावून श्वानला कसे हाताळावे याविषयी माहिती दिली. याशिवाय, लॅब्राडॉर, गोल्डन रिट्रिव्हर, कोली, सयबेरिअन हस्क, पुडल, बॉक्सर, डॉल्मेशिअन, कॉकर स्पॅनिअल, स्पिट्झ, अफगाण हाउंड, बेल्जियन मॅलीनॉईस, जर्मन शेफर्ड, डॉबरमन, रॉटविलर, ग्रेटडेन, मॅस्टीफ, सेंट बर्नार्ड, पग, बिगल, डशहाउंड, मिनिएचर पिसिंचर, शिझू, पॉमेरिअन, मल्टिस, शिबा इनु, चिवाव्हा, अशा श्वानांच्या प्रजाती, तर मैनकुन, पर्शियन, इंडीमाऊ, सियामीज आणि बंगाल, अशा मांजरींच्या प्रजाती प्राणीप्रेमींना पहाव्यास मिळाल्या. त्याचबरोबर याठिकाणी विविध खाद्यपर्थांचे व पेय स्टाॅल लावण्यात आले होते. तिथेही खाद्यपदार्थांची चव नागरिकांनी चाखली.