ठाकुर्लीतील बारा बंगला भागातील रेल्वेच्या हद्दीतील २५० झाडे खेळाच्या मैदानासाठी तोडण्याच्या रेल्वेच्या प्रस्तावास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने विरोध करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी ‘रानवाटा’ संस्थेतर्फे पालिका आयुक्त मधुकर अर्दड यांची भेट घेऊन करण्यात येणार आहे.
येथील २५० झाडे खेळाच्या मैदानासाठी तोडण्यात येणार आहेत. ही झाडे तोडण्याची परवानगी कल्याण-डोंबिवली पालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती देते. दोन महिन्यांपासून समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला येत आहे. ‘लोकसत्ता’ने सतत ही झाडे तोडण्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने समिती व प्रशासनाने वेळकाढूपणा करून स्थगित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या वर्षी या भागातील ६३ झाडे तोडली होती. या झाडे तोडण्याच्या विरोधात स्थानिक नगरसेवक श्रीकर चौधरी आक्रमक भूमिका घेत आहेत. काही सदस्य बहुमताच्या जोरावर चौधरी यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा