शून्य कचरा आणि बहुमूल्य कार्बन निर्मितीचा शास्त्रज्ञ शरण दाम्पत्याचा प्रयोग
महानगरांची सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेल्या कचऱ्याच्या समस्येवर एक पर्यावरणस्नेही, प्रदूषणविरहित उपाय शोधण्यात महादेव आणि माधुरी या डोंबिवलीस्थित शरण दाम्पत्याला यश आले आहे. प्लास्टिकपासून मेण बनविण्यात यशस्वी ठरलेल्या या शास्त्रज्ञ दाम्पत्याने प्लास्टिकसह सर्व कचऱ्याचे सोसायटीच्या आवारातच अवघ्या काही तासांत विघटन करण्याचा उपाय शोधला आहे. कचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणारे ठाण्यातील प्रशांत गुप्ते यांनी ते राहत असलेल्या ब्राह्मण सोसायटीतील इमारतीवर प्रायोगिक तत्त्वावर हे यंत्र बसवून त्याची यशस्वी चाचणी घेतली. या विजेरी यंत्रात एक-दीड तासात कचऱ्याचे दहन होऊन त्यापासून अ‍ॅक्टिव्ह कार्बन आणि कार्बन नॅनो टय़ूब्स् ही बहुमूल्य मूलद्रव्ये मिळतात. शरण दाम्पत्य सध्या सोलापूर येथील वालचंद महाविद्यालयातील नॅनो टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख आहेत.
सध्या महामुंबई परिसरात दररोज निर्माण होणाऱ्या हजारो टन कचऱ्याचे व्यवस्थापन ही मोठी समस्या आहे. सर्वच महानगरांच्या क्षेपणभूमींची कचरा व्यवस्थापनाची क्षमता संपली आहे. मात्र दुसरा पर्याय नसल्याने अस्तित्वात असलेल्या ठिकाणीच संबंधित स्थानिक प्रशासने कचरा टाकत आहेत. त्यामुळे बहुतेक सर्व क्षेपणभूमींवर कचऱ्याचे डोंगर झाले आहेत. एक दिवस जरी घंटागाडी आली नाही तरी कचरा उघडय़ावर पडून सडतो. त्याला दरुगधी सुटते. त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. सुयोग्य कचरा व्यवस्थापन प्रणाली राबविल्याशिवाय कल्याण-डोंबिवली महानगर परिसरात नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला दिले आहेत. सध्या क्षेपणभूमीशिवाय कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे विविध प्रयोग ठाणे शहरात वैयक्तिक अथवा सामूहिक पातळीवर राबबिले जात आहेत. त्यात आता या नव्या यंत्राची भर पडली आहे.
असे होते विघटन
सूक्ष्मातिसूक्ष्म तंत्रज्ञानात (नॅनो टेक्नॉलॉजी) संशोधन करीत असलेल्या शरण दाम्पत्याने आतापर्यंत(पान ८वर)

या यंत्रणेद्वारे कचरा जाळून सूक्ष्मातिसूक्ष्म तंत्रज्ञानात बहुमूल्य मानले जाणारे बहुमूल्य कार्बन मिळते. जगभरातील शास्त्रज्ञांनी शुद्ध स्वरूपातल्या कार्बनचे महत्त्व मान्य केले आहे. घनरूप कचऱ्यापासून मिळणारे कार्बन हे उत्तम दरुगधी शोषक (डिओड्रंट) आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी त्याचा चांगला वापर होऊ शकतो. घरात तसेच सार्वजनिक ठिकाणी त्याची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. याशिवाय हे कार्बन मिसळल्याने सीमेंटची शक्ती कैकपटीने वाढून बांधकाम अधिक मजबूत होत असल्याचे आढळून आले आहे.
– डॉ. माधुरी शरण,

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका