लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सरकता जिना मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केला. मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या सरकत्या जिन्याचे काम पूर्ण करुन तो खुला करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती.

ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातील लोकवस्ती वाढली आहे. ९० फुटी रस्ता, डोंबिवली एमआयडीसी, पेंडसेनगर, सारस्वत काॅलनी भागातील बहुतांशी रेल्वे प्रवासी कमी गर्दी म्हणून ठाकुर्ली रेल्वे स्थानकात लोकल प्रवासासाठी येतो. या वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत ठाकुर्ली रेल्वे स्थानकात सुविधांची वानवा होती. सरकता जिना सुरू करुन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला आहे.

आणखी वाचा-मुलीचा संसार विस्कटल्याने वृध्द आईची आत्महत्या; मीरा रोड मधील घटनेने हळहळ

अनेक प्रवाशांना हदयाचे आजार, काहींना अस्वस्थतेच्या व्याधी असतात. ज्येष्ठ नागरिक, वृध्द मंडळींना रेल्वे स्थानकात येताना जिने चढणे अवघड होते. त्यामुळे बहुतांशी प्रवासी रेल्वे स्थानकातील सरकते जिने सुरू करा, अशी मागणी करत होते. मध्य रेल्वे प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करुन हे जिने गुरुवारी सुरू केले. काही राजकीय मंडळींनी या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

Story img Loader