लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: ‘नवा कोरा पूल बांधून तयार आहे. लोकांच्या पैशातून उभारलेल्या या पुलाचे राजकारण्यांना कधी उद्घाटन करायचे तेव्हा करू द्या. आता पूल वाहतुकीसाठी सज्ज आहे ना. मग त्याचा आम्ही वापर करणारच,’ असे इशारे देत डोंबिवलीतील रहिवाशांनी ठाणे, मुंबईकडे जाण्यासाठी येथील रेतीबंदर खाडीवरील मोठागाव-माणकोली उड्डाण पुलाचा वाहनाने वापर सुरू केला आहे.

shiv sena shinde group claim 73 thousand duplicate voters in navi mumbai
गावाकडच्या दुबार मतदारांमुळे नवी मुंबईत खळबळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार

डोंबिवलीतील बहुतांशी नोकरदार आता दुचाकी, चारचाकी वाहनाने माणकोली पुलावरुन ठाणे, मुंबईतील कामाच्या ठिकाणी जात आहेत. मालवाहू वाहनांची माणकोली पुलावरुन वाहतूक सुरू झाली आहे. माणकोली पुलाचा खाडीवरील भाग मार्चमध्येच बांधून पूर्ण झाला आहे. भिवंडी बाजूकडील मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या पोहच रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा… काँग्रेस देणार पालिकेला डांबर आणि सिमेंट दान; रस्त्यांच्या दुरावस्थेवरून काँग्रेस करणार उपरोधी आंदोलन

डोंबिवली बाजुकडील पुलावरुन उतार रस्त्याचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. आता डोंबिवलीतील प्रवासी वाहनाने पंडित दिनदयाळ रस्त्याने रेतीबंदर रेल्वे फाटकातून नवनाथ मंदिरासमोरील रस्त्यावरुन माणकोली पुलाच्या दिशेने जातात. तेथून माणकोली पुलावरुन थेट मुंबई- नाशिक महामार्गे ठाणे, मुंबई किंवा पडघा, शहापूर दिशेने प्रवास सुरू करीत आहेत. माणकोली पूल रस्त्यावरुन वाहने सुसाट जात असून यामुळे शिळफाटा, दुर्गाडी पूल रस्त्यावरील वाहनांचा भार कमी होऊन हा रस्ता कोंडीमुक्त झाला आहे.

वाहने रोखली

प्रवाशांनी माणकोली पुलाचे उद्घाटन होण्यापूर्वीच वाहने नेण्यास सुरूवात केल्याची माहिती एमएमआरडीए अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी पुलाच्या दोन्ही बाजुला अडथळे उभे करण्याचा प्रयत्न केला. हे अडथळे प्रवाशांकडून काढून टाकण्यात आले. पुलासाठी करदाते म्हणून आम्ही पैसे मोजले आहेत, असे पुलाच्या रखवालदाराला बजावत प्रवाशांनी अडथळे दूर केले.

सुसाट प्रवास

डोंबिवलीतून माणकोली पुलाने ठाण्याचा प्रवास अर्धा तासात तर मुंबईचा प्रवास एक तासाच्या आत पूर्ण होतो. या मार्गावरून कोंडीमुक्त प्रवास होत असल्याची प्रतिक्रिया डोंबिवलीतून बांद्रे येथे दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या कैलास किर्वे यांनी दिली. माणकोली पुलावरुन प्रवास करताना अनेक वेळा पुलाच्या दोन्ही बाजुला रखवालदार वाहने नेण्यास मज्जाव करतो. भिवंडी बाजुला पुलाच्या उतार रस्त्यावर अवजड दगड जेसीबीने ठेवलेले असतात. दोन ते तीन प्रवासी एकत्र येऊन ते दगड बाजुला करुन पुढचा प्रवास सुरू करतात, असे काही प्रवाशांनी सांगितले. डोंबिवली बाजुकडील पुलाचे पोहच रस्ते, दिवा-वसई रेल्वे मार्गावरील रेतीबंदर फाटकावरील उड्डाण पूल पूर्ण झाल्यावर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पूल निश्चित केव्हा सुरू होईल, यावर बोलणे मात्र त्यांनी टाळले.

चुकीमुळे विलंब

पुलाचा डोंबिवली बाजुकडील उतार रस्त्याची सीमारेषा एमएमआरडीएकडून चुकली आहे. उतार रस्ता पालिकेच्या ४५ मीटर रुंदीच्या उतार मार्गात आणून उतरविण्यात आला आहे. या चुकीमुळे उतार रस्त्याला पुलाच्या डावी, उजवी बाजुकडे वळण देण्याचे नियोजन प्राधिकरणाने केले असल्याचे समजते. या वळण रस्त्यामुळे रेतीबंदर फाटकाकडे येणारा रस्ता पूल सुरू झाल्यावर बंद करण्यात येणार असल्याचे समजते. या पुलाच्या उद्घाटनावरुन लोकप्रतिनिधींमध्ये जुंपली आहे. मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी पूल वाहतुकीसाठी खुला करा, असे जाहीर केले आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पुलाचे उद्घाटन करण्यासाठी चोरुन येऊ नका, असा सल्ला ट्विटरव्दारे दिला आहे.