आठवडाभर चाललेल्या या फेस्टिव्हलच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाबरोबरच त्यांच्या कलागुणांचे दर्शन या निमित्ताने घडून आले. या महोत्सवातील रॉक ब्रॅण्डचे सादरीकरण खास आकर्षण ठरले. प्रीझम आणि कोशिश या रॉक ब्रॅण्ड क्षेत्रातील तरुणांनी रॉकिंग आणि मेटल साँगच्या सुरावटींनी तरुणाईला थिरकरण्यास भाग पाडले. तर महाविद्यालयातील तरुण-तरुणींच्या फॅशन शो, नृत्यालासुद्धा तितकीच दाद मिळाली. अखेरच्या सत्रामध्ये बक्षीस वितरणासाठी बॉलीवूडमधील मंडळींनी महाविद्यालयात हजेरी लावली होती. त्यामध्ये दिग्दर्शक आदी इराणी, करण शर्मा, लिलीपुत फ्रुक्वी आणि भूषण मेनन उपस्थित होते. महाविद्यालयाचे डॉ. एच. एस. चिमा, साईकिरण खन्ना, हंसराज गोहीलोत आणि रिता शक्तीवरन हेदेखील विद्यार्थ्यांसोबत उत्साहाने या महोत्सवात सहभागी झाले होते. ऑनलाइन गेमिंगमधील आघाडीचा ‘खेळाडू’ बेल वर्गीस याच्या हस्ते विजेत्यांना किबोर्ड, माऊससारख्या भेटवस्तूंनी सन्मानित करण्यात आले. अभ्यास आणि करिअर सांभाळून विद्यार्थ्यांनी ‘गेमिंग’कडे वळावे, असा सल्ला बेल याने दिला. गेमिंगमधील यशासाठी चिकाटी आणि समर्पकता अंगी बाणवण्याची गरज असल्याचेही त्याने म्हटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा