ध. ना. चौधरी शाळेच्या १९८० च्या बॅचचे दरवर्षी स्नेहसंमेलन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्वसाधारणपणे शालेय जीवन दहा वर्षांचे असते. मात्र डोंबिवलीतील ध. ना. चौधरी शाळेचे माजी विद्यार्थी गेली २० वर्षे सातत्याने भेटून त्या काळातील सोनेरी आठवणींना उजाळा देत आहेत. शाळेतील मित्र-मैत्रिणी, मधली सुट्टी, ठरलेले बाकडे, आवडते शिक्षक या आठवणी मोठेपणी कुठे तरी हरवून जातात. परंतु त्या आठवणी वयाच्या पन्नाशीलाही जपण्याचा प्रयत्न करत आहेत ते म्हणजे डोंबिवलीतील ध. ना. चौधरी शाळेचे १९८० च्या बॅचचे माजी विद्यार्थी. वर्षांतून एकदा का होईना ते शाळेतील मित्र-मैत्रिणींची गाठ आजही घेत आहेत आणि जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.

धनाजी नाना चौधरी बहुउद्देशीय विद्यालय डोंबिवलीच्या १९८० च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी १३ डिसेंबरला रामभाऊ भिसे विद्यालयात एकत्र जमले होते. डीएनसी शाळेची माजी विद्यार्थिनी सुलभा कांबळे या भिसे शाळेच्या संचालिका आहेत. त्यांच्याच आग्रहास्तव यंदाची भेट भिसे शाळेत ठरविली होती. गेली २० वर्षे वर्षांतून एकदा डिसेंबरच्या दुसऱ्या रविवारी भेटते. या बॅचचा दादा असलेल्या शैलेंद्र सोनटक्के यांनी १९९४ सालापासून १९८० सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना एकत्र जमविण्यास सुरुवात केली होती. प्रशांत शौचे, राजेंद्र चौधरी, नितीन कळंबे यांच्या साहाय्याने तसेच एकमेकांच्या ओळखीतून इतर वर्ग सहकाऱ्यांचेही पत्ते मिळाले आणि सर्व मुले-मुली एकत्र आले.

एकत्र जमल्यानंतर हे माजी विद्यार्थी बादलीत चेंडू टाकणे, संगीत खुर्ची, बुक बॅलन्स आदी लहान मुलांचे खेळ खेळून त्या वेळची मज्जा-मस्ती पुन्हा एकदा अनुभवतात. यातच काही जणांची पन्नासीही साजरी होते. सामाजिक भान जपत या विद्यार्थ्यांनी त्यांच्या एका शिक्षकांना मदत केली आहे, तसेच आनंदवनच्या वाद्यवृंदाला, नेरळजवळच्या एका शाळेतील दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची फी भरली. वृद्धाश्रमात जाऊन तेथील ज्येष्ठांसोबत गप्पा मारणे, जेवण करणे, देणगी देणे अशी मदत केली आहे.