कल्याण येथील चक्कीनाका भागातील एका अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या विशाल गवळीकडे तो मानसिक रुग्ण असल्याचा दाखला पोलिसांना तपासात आढळून आल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे. याच दाखल्याच्या आधारे त्याने यापूर्वी दोन वेळा न्यायालयातून जामीन मिळवल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे.

ठाणे गुन्हे शाखा आणि कल्याण गुन्हे शाखेचे पथक अल्पवयीन मुलगी हत्या प्रकरणाचा विविध बाजुने तपास करत आहे. मुलीची हत्या केल्यानंतर विशाल बुलढाणा येथे पळून गेला होता. गुरुवारी सकाळी त्याला ठाणे येथे गुन्हे शाखेच्या पथकाने ठाण्यात आणले. त्याला नौपाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने विशालला पत्नीसह दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ठाणे पोलिसांनी नोंदविला माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब; कथित गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी वसूली प्रकरण
life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी

हेही वाचा >>>कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी

विशालवरील यापूर्वीचे गुन्हे आणि त्याने हे कृत्य का केले, त्याच्या सोबतीला अन्य कोणी साथीदार होते का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या तपासातून विशालकडे तो मानसिक रुग्ण असल्याचे दाखले असल्याचे पुढे आले आहे. या दाखल्याच्या आधारे विशालने यापूर्वी न्यायालयातून जामीन मिळविले आहेत, अशीही माहिती तपासात पुढे येत आहे. विशालवर एकूण सहा गु्न्हे दाखल आहेत. यामध्ये विनयभंग, जबरी चोरी, मारहाण या गुन्ह्यांचा अंतर्भाव आहे. यापूर्वी त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती. कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा कल्याणमध्ये परतला. विशालसारखेच इतर चार गुन्हेगारांकडे ते मनोरुग्ण असल्याचे दाखले आहेत, अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. हे गुन्हेगार मानसिक रुग्ण असल्याचे दाखले त्यांना कोणी दिले. कशाच्या आधारावर दिले, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Story img Loader