डोंबिवली : डोंबिवली ‘एमआयडीसी’तील ‘अमुदान’ या रसायन कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट होऊन त्यात आठ कामगार ठार, तर ६५ जखमी झाले. जखमींमध्ये शेजारच्या काही कंपन्यांतील कामगारांचाही समावेश आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीत कंपनी भस्मसात झाली. या स्फोटाने तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला.

पहिल्या भीषण स्फोटानंतर काही क्षणांत कंपनीत आगडोंब उसळला. आगीचे लोळ आणि धुराचे लोट अवकाशात झेपावले. कंपनीतील ज्वलनशील रसायनांचे साठे आगीच्या संपर्कात येताच स्फोटांची मालिकाच सुरू झाली. लागोपाठ आठहून अधिक स्फोट ऐकू आले. या कंपनीपासून दोन-तीन किमी परिसरात राख, लोखंडाच्या बारीक तुकड्यांचा सडा पडल्याचे चित्र होते. नऊ वर्षांपूर्वी प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटानंतरची डोंबिवली एमआयडीसीतील आगीची ही सर्वांत मोठी दुर्घटना आहे.

accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Image Of Kannauj Building Collapse
Kannauj Building Collapse : उत्तर प्रदेशात रेल्वे स्थानकावर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले
Assam Assam Coal Mine Rescue
Assam: दुर्दैवी घटना! आसाममध्ये २०० फूट खोल बेकायदा कोळसा खाणीतून एका कामगाराचा मृतदेह काढला; ९ जण अद्यापही अडकलेलेच
126 killed in earthquake in Tibet news
तिबेटमध्ये भूकंप, १२६ ठार,रिश्टर स्केलवर ६.८ तीव्रता; १८८ जण जखमी
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
deccan police registered case against four including woman for allegedly assaulting anti encroachment squad
फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा >>>Dombivli Blast : “२५ ते ३० जण जेवण करत होते, तेवढ्यात मोठा आवाज आला आणि छत…” हॉटेल मालकाने सांगितली आपबिती

आगीचे भीषण रूप लक्षात घेऊन ‘अमुदान’ कंपनीचा २०० मीटरचा परिसर पोलिसांनी बंद केला. कल्याण- डोंबिवली महापालिका, एमआयडीसी, शेजारच्या महापालिकांचे दहाहून अधिक बंब रात्री उशिरापर्यंत आग विझवत होते. आग शेजारच्या कंपन्यांत पसरू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात होती. तरीही लगतच्या तीन कंपन्यांना आगीची झळ बसली.

स्फोटाची भीषणता एवढी होती की दुर्घटनाग्रस्त कंपनीलगतच्या ओमेगा, श्रीनिवास केमिकल, कॉसमॉस, डेक्सन, पीमको, चावरे इंडस्ट्री, शक्ती, महल प्रिंटिंग, राज सन्स, डेक्कन कल या कंपन्यांमधील कामगारही जखमी झाले. दुर्घटनेतील जखमींवर ‘एमआयडीसी’तील एम्स, नेपच्यून, महापालिकेचे शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई आणि अरुंदम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती. मृतांसह जखमींची संख्याही वाढण्याची भीती आहे.

रिजन्सी इस्टेट, एमआयडीसी निवास, पलावा, २७ गावे आणि डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यालगतच्या घरांना स्फोटाचा हादरा बसला. स्फोटाने दोन किमी परिसरातील इमारतींच्या काचा, खिडक्यांची तावदाने, दुकानांची शटर्स, जाहिरात फलक तुटले. प्रथम भूकंप झाल्याचे समजून रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली होती.

हेही वाचा >>>डोंबिवली बॉयलर स्फोटाच्या धक्याने एका हॉटेलचे छत कोसळले; छताखाली अडकले ग्राहक

हवेत राखेचा पट्टा

दर्घटनास्थळापासून अर्ध्या किमीवरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर अवकाशातून राखेचा वर्षाव झाल्याचे सांगण्यात येते. काही काळ हवेतही राखेचा एक पट्टा तयार झाला होता. दुर्घटनाग्रस्त कंपनीच्या परिसरातील अन्य कंपन्यांच्या कामगारांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. निवासी इमारतींमधील रहिवाशांनाही घराबाहेर पडण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या.

स्फोटानंतर एम्स रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी रुग्णालयाच्या सात रुग्णवाहिका जखमी कामगारांना आणण्यासाठी दिल्या. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या नातेवाईकांनी रुग्णालयांत गर्दी केली होती.

दुर्घटनाग्रस्त कंपनीसह लगतच्या कंपन्यांतील कामगारही स्फोटात जखमी झाले असून मृतांची ओळख पटलेली नाही, असे कल्याणचे तहसीलदार सचिन शेजळ यांनी सांगितले.

शिळफाटा रस्त्यावर कोंडी

आगीची दुर्घटना पाहण्यासाठी वाहनचालकांनी आपल्या वाहनांचा वेग कमी केल्याने शिळफाटा रस्त्यावर मोठी वाहन कोंडी झाली होती. दुर्घटनाग्रस्त कंपनीलगतच्या रस्त्यावरची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली होती. त्यामुळे एमआयडीसीच्या अनेक रस्त्यांवर वाहनांची रखडपट्टी झाली होती.

दुर्घटनास्थळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदुमती जाखड, महापालिका तसेच जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभागाचे अधिकारी, कल्याण- डोंबिवली पालिकेचे वैद्याकीय पथक नियंत्रणासाठी तैनात आहे.

जखमी कामगार

अंकुश कुंभार, जानकी नायर, रवींद्र राम, अखिलेख मेहता, सोनु कुमार, शिऱीष तळेले, शिवराम थावले, शिवम तिवारी, मनोज कुमार, इंदरपाल भारव्दाज, रिना कनोजिया, राहुल पोटे, सुदर्शन मेहता, मनीषा पोखरकर, प्रिन्स गुप्ता, संजय महातो, सागर ढोले, किशोर सावंत, रवी कुमार, तेजल गावीत, विकास मेहता, सुजाता कनोजिया, सागर दास, राम चौहान, प्रतीक वाघमारे, राजन घोटणकर, बबन देवकर, रज्ञेश दळवी, प्रवीण चव्हाण, मधुरा कुलकर्णी, हेमांगी चूक, किशोर विचपाक, अशोक पाटील

Story img Loader