ठाणे : क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणाऱ्या सोनू जालान त्याचे साथिदार केतन तन्ना आणि जय तन्ना या तिघांविरोधात ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Maharashtra News Live : विधिमंडळ कामकाजाला घोषणाबाजीने सुरुवात; राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!

हेही वाचा : डोंबिवलीत राजाजी रस्त्यावरील घरात भरदिवसा चोरी

सुमारे वर्षभरापूर्वी सोनू जालान आणि केतन तन्ना यांच्या तक्रारीवरुन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ठाणे पोलीस दलातील तत्त्कालीन पोलीस अधिकारी आणि काही खासगी व्यक्ती अशा २८ जणांविरोधात पाच कोटी रुपयांचा  खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणानंतर पोलीस दलात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता सोनू जालान आणि त्याच्या साथिदारांविरोधात एका व्यक्तीने खोट्या गुन्ह्यात अडकवू नये यासाठी त्यांनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार अर्ज ठाणे न्यायालयात केला. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जालान आणि त्याच्या साथिदारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extortion case filed bookie sonu jalan betting cricket police ysh