कल्याण पूर्वेतील कोळसेवाडीमधील एका महिला शाळा चालकाकडे एक लाख रुपयांची खंडणीची मागणी चार जणांनी केली आहे. खंडणीची रक्कम दिली नाही तर मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- कल्याण: शहापूर तहसीलदारांसाठी लाच मागणाऱ्या शिपाई, मध्यस्थांवर गुन्हा दाखल

anticipatory bail application of illegal school principal rejected by pune court
बेकायदा शाळेच्या मुख्याध्यापिकेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
Chhota Rajan gang. session court. Pre-arrest bail ,
विकासकाकडून दहा कोटींची खंडणी मागण्याचे प्रकरण : छोटा राजन टोळीच्या दोघांना सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन
pcmc issue seized notice to Hotels hospitals schools and educational institutions over property tax arrears
पिंपरी : थकबाकी असलेले हॉटेल, रुग्णालय, शाळा होणार जप्त
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
female accountant embezzles rs 2 5 crore lakh from famous educational institution
शिक्षण संस्थेतील रोखपाल महिलेकडून अडीच कोटींचा अपहार; डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल

आतापर्यंत व्यावसायिक, उद्योजक, विकासक यांच्याकडे खंडणीची मागणी करणारे गुन्हेगार आता शाळा चालकांकडे खंडणी मागू लागल्याने शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असे प्रश्न नागरिक, शाळा चालकांकडून उपस्थित केले जात आहेत. लक्ष्मी हरिहरन मद्दुरू (४६) या कोळसेवाडी मध्ये साई इंग्लिश स्कूल नावाने शाळा चालवितात. त्यांच्या शाळेत हा प्रकार घडला आहे. अर्जुन सोनावणे, विवेक बर्वे आणि इतर दोन अनोळखी इसम यांनी ही खंडणीची मागणी केली आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजता हा प्रकार शाळेच्या आवारात घडला आहे. शाळेने ईमेल माध्यमातून आणि प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली आहे.

हेही वाचा- ठाण्यात भाजपा पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा भाजपाचा आरोप

पोलिसांनी सांगितले, श्रीलक्ष्मी या कोळसेवाडी विभागात शाळा चालवितात. मंगळवारी दुपारी आरोपी तरुण हे शाळेच्या आवारात सुरक्षा रक्षकाला न जुमानता शिरले. त्यांनी शाळेच्या कार्यालयात जाऊन तेथे श्रीलक्ष्मी मुद्दुरू यांना आम्ही गुन्हेगार पार्श्वभूमीची तडीपार लोक आहोत. आम्हाला याठिकाणी गिरी आणि त्याच्या पत्नीने येथे पाठविले आहे. आम्हाला तात्काळ एक लाख रुपये पाहिजेत. पैसे दिले नाहीत तर तुम्हाला मारल्या शिवाय ठेवणार नाही अशी धमकी दिली. आम्ही पैसे देऊ शकत नाही आणि कसले पैसे असे प्रश्न श्रीलक्ष्मी यांनी उपस्थित केले. त्यावेळी आरोपींनी त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यावेळी श्रीलक्ष्मी यांची मुलगी तेथे उपस्थित होती. तिलाही शिवीगाळ करण्यात आली.

हेही वाचा- ठाणे: पोलिओ लशीची तिसरी मात्रा जानेवारी पासून

आता आम्ही जात आहोत. परंतु, पैसे तयार ठेवा आम्ही पुन्हा येणार आहोत, असे बोलून आरोपी निघून गेले. जाताना त्यांनी आई, मुलीला मारण्याची धमकी दिली. शाळेने याप्रकरणी तात्काळ कोळसेवाडी पोलिसांना कळविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. आर. देशमुख यांनी तातडीने शाळेला भेट दिली. याठिकाणी पुन्हा असा अनुचित प्रकार घडणार नाही यादृष्टीने उपाययोजना केल्या. शाळा परिसरातील पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Story img Loader