ठाणे : ठाणे जिल्ह्यातील उद्योजकांकडून माथाडी संघटनांच्या नावाने खंडणी उकळण्याचा प्रकार गेल्याकाही महिन्यांपासून ठाणे शहरात सुरू झालेला आहे. या प्रकाराची दखल ठाणे पोलिसांनी घेतली असून त्रास देणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. बुधवारी ठाणे पोलिसांची ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रियल असोसिएशनसोबत (टिसा) बैठक झाली. या बैठकीत पोलिसांनी उद्योजकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा >>> ठाणे: घोडबंदर मार्गावर मेट्रो कामामुळे वाहतूक बदल; २३ मार्चपर्यंत दररोज मध्यरात्री अवजड वाहनांना बंदी

Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

पुण्यासह राज्यात अनेक उद्योजक आपली गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. मात्र, काही बनावट माथाडी कामगारांचे नेते तयार झाले असून ते उद्योजकांना कंत्राटांसाठी त्रास देतात. अशा लोकांचे कंबरडे मोडा, असे स्पष्ट आदेश काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील उद्योजकच माथाडी संघटनेच्या नावाने दमदाटी आणि खंडणी उकळण्याच्या प्रकारामुळे हैराण झाले आहेत. मागील काही महिन्यांपासून ठाण्यातील वागळे इस्टेट, नवी मुंबई शहरात असे प्रकार वारंवार वाढत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. हे अधिकृत माथाडी कामगार नसून माथाडी कामगार पुरवण्याच्या नावाखाली खंडणी वसूल करणारे गुंड असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. माथाडी कामगारांच्या नावाने सुरू असलेल्या खंडणी वसूलीसंदर्भाचे वृत्तही २४ जानेवारी या दिवशी ‘लोकसत्ता ठाणे’ सह दैनिकात उद्योजकांना खंडणीसाठी धमक्या अशा आशयाने प्रसिद्ध झाले होते.

हेही वाचा >>> ठाणे महापालिकेचे आता मिशन शौचालय दुरुस्ती; नऊशेपैकी सातशे सार्वजनिक शौचालयांची होणार दुरुस्ती

उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांसदर्भात ठाणे पोलिसांची बुधवारी टिसा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीस उपायुक्त शिवराज पाटील, अमरसिंग जाधव, यांच्यासह वाहतूक नियंत्रण शाखा, गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस ठाण्यातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी माथाडी संघटनांच्या नावाने बनावट माथाडी कामगारांकडून होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उद्योजकांनी उपस्थित केला. वागळे इस्टेट आणि श्रीनगर भागातील माथाडी कामगारांची बैठक घेऊन त्यांना सूचना देणार असून उद्योजकांना त्रास देणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अनेकजण कारखान्यातील भंगार घेण्याच्या ठेक्यावरून उद्योजकांना त्रास देत असतात. त्यांनाही नोटीस देण्यात येईल असे पोलिसांनी स्प्ष्ट केले. कारखाने, कंपनी परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त वाढविणार असल्याचे उपायुक्त जाधव यांनी सांगितले. सण-उत्सवांदरम्यान वागळे इस्टेट भागातील काही मंडळाचे पदाधिकारी जबरदस्तीने वर्गणी वसूल करत असतात. त्यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्यांसदर्भात पोलिसांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. कंपन्यांच्या प्रवेशद्वाराजवळ आधुनिक कॅमेरे बसविण्याचे आवाहन उद्योजकांना उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले आहे.

वाहतूक कोंडी मोठी समस्या

वागळे इस्सेट भागात वाहने उभी करण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. औद्योगिक क्षेत्रात भरणारे आठवडी बाजार, दोन्ही दिशेला बेकायदेशीररित्या वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. त्यावरही तोडगा काढण्यांसदर्भात वाहतूक पोलिसांशी चर्चा झाली.