डोंबिवली– डोंबिवलीतील गांधीनगर मधील सह दुय्यम निबंधक चार कार्यालयात अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन भूमाफिया आणि दलाल मालमत्ता खरेदी-विक्रीची दस्त नोंदणी करुन घेत होते. मागील तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. ‘लोकसत्ता’ने हा बनावट दस्त नोंदणीचा प्रकार उघड केल्यानंतर जागृत झालेल्या अधिकाऱ्याने सोमवारी दस्त नोंदणीसाठी दाखल बनावट दस्त ऐवज पकडले.

हेही वाचा >>> अनधिकृत बांधकामे आढळली तर थेट आयुक्तांवर कारवाई; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा

man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Pimpri Chinchwad Anti Terrorism Branch exposed gang of fake police verification certificates
बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफश
snake bites disease
सर्पदंश हा आजार मानला जाणार? कारण काय? याला अधिसूचित आजार घोषित करण्याची मागणी केंद्राकडून का होत आहे?
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
Dombivli tax arrears people, Dombivli property seal,
डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे
15 crores governor post marathi news
१५ कोटी द्या, राज्यपाल करतो…तामिळनाडूतील एकाची कोट्यवधी रुपयांना फसवणूक
Four lakhs cash was stolen, hotel, Kalyaninagar area,
कल्याणीनगर भागातील हॉटेलमधून चार लाखांची रोकड चोरीला

कल्याण मधील चिकणघर मधील होली क्राॅस रुग्णालया समोरील सह दुय्यम निबंधक दोन आणि डोंबिवलीतील सह दुय्यम निबंधक चार कार्यालयात गेल्या तीन महिन्यांपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिशाभूल करुन मालमत्तांची बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन दस्त नोंदणी सुरू असल्याची माहिती एका विश्वसनीय सुत्राने प्रस्तुत प्रतिनिधीला दिली. या माहितीची खात्री केल्यावर ती खरी असल्याचे समजले.

हेही वाचा >>> डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगरमध्ये दोन बेकायदा इमारतींची उभारणी, बनावट कागदपत्रांव्दारे सदनिकांची विक्रीची तयारी

या संबंधीचे सविस्तर वृत्त ‘लोकसत्ता’ ऑनलाईन माध्यमात प्रसिध्द होताच, सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ झाले. त्यांनी दलालांच्या माध्यमातून कार्यालयात दस्त नोंदणीसाठी दाखल होणारा कागद बारकाईने तपासण्यास सुरुवात केली. डोंबिवलीतील सह दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवारी दोन दलाल दस्त नोंदणीसाठी बनावट कागदपत्र घेऊन हजर होते. त्यांच्या कागदपत्रांची कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी पडताळणी करुन दस्तऐवज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे शिक्का आणि स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले. त्यावेळी वरिष्ठांनी कागदपत्रांविषयी संबंधित दोन दलालांना प्रश्न करताच, ते गडबडले. त्यांची चोरी पकडली गेली. बनावट दस्त ऐवज दाखल करणाऱ्या दलालांवर अधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Story img Loader