ठाणे : विवाहाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून एका मृत तरुणाची १९ कोटी ७० लाख रुपयांची संपत्ती बळकाविणाऱ्या महिलेला तिच्या साथिदारांसह ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सोमवारी अटक केली. अंजली अग्रवाल (३०), थाॅमसर गोडपवार (५०), महेश काटकर (३७) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.२००९ पासून ते एका गंभीर आजाराने त्रस्त होते. या आजारामुळे २३ नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अचानक अंजली अग्रवाल हिने विवाहाचे प्रमाणपत्र दाखवित त्यांच्या संपत्तीवर दावा ठोकला होता. १९ कोटी ७० लाख रुपये किमतीची स्थावर आणि जंगम मालमत्ता अंजली अग्रवाल हिच्या नावावर झाली होती.
दरम्यान, त्यांच्या आईने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे, हा विवाह प्रमाणपत्र बनावट असलेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार अंजली हिच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून सुरू होता. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या पथकाने अंजली हिचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन तिला ताब्यात घेतले.
हेही वाचा : ठाणे : दसरा मेळाव्यामुळे आज रेल्वे आणि रस्ते मार्ग होणार तुडूंब
तिची कसून चौकशी केली असता, तिने हे प्रमाणपत्र ठाण्यातील थाॅमसर गोडपवार आणि महेश काटकर यांच्या मदतीने हे बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी अंजलीची चौकशी केली. त्याच्या मृत्यूनंतर तिने थाॅमसर आणि महेशच्या मदतीने बनावट विवाह प्रमाणपत्र तयार केले. अशी कबूली दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.