भिवंडी तालुक्यातील िपपळास गावाजवळील ‘सिटी हर्बल’ या दुकानात विनापरवाना अॅलोपॅथी औषधांचा साठा आणि बनावट आयुर्वेदिक औषधे बनविण्यासाठीची सामग्री जमवून त्याची विक्री करणाऱ्या चौघांवर कोनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या वेळी साडे आठ लाख किमतीच्या औषधांचा साठा पोलिसांनी जप्त केला. औषध निरीक्षक नितीन पद्माकर यांच्या फिर्यादीवरून कोनगाव पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली. या प्रकरणी सिटी हर्बल प्रा. लि.चे संचालक नितीनकुमार शिंदे, मुकेश दानी, रेणू एम. रॉम यांच्याावर विनापरवाना व बनावट औषध विक्रीप्रकरणी सरकारची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 19-10-2015 at 00:19 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake medicine seized near bhivandi