बदलापुरातील दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर मंगळवारी मोठा जनक्षोभ उसळला. बुधवारी शहरात तणावपूर्ण शांतता असली तरी अफवांचा बाजार तेजीत होता. सुरुवातीला चिमुकल्यांच्या कुटुंबीयांबद्दल आणि सायंकाळनंतर चक्क चिमुकल्यांबद्दल चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली. मात्र या सर्व अफवा होत्या, अशी माहिती कुटुंबीयांच्या सहकाऱ्यांनी कळवले. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही आवाहन या प्रकरणात पुढाकार घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी मदत करणाऱ्या संगीता चेंदवणकर यांनी दिली आहे. बदलापुरातील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर देशभरात संताप व्यक्त होतो आहे. मंगळवारी शहरात मोठा जनक्षोभ उसळल्यानंतर बुधवारी शहरात तणावपूर्ण शांतता होती. अफवा आणि नागरिकांमध्ये पुन्हा चुकीची माहिती प्रसारित होऊ नये म्हणून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या आदेशानंतर २० ऑगस्टपासून बुधवारी मध्यरात्रीपर्यंत बदलापूर शहरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

मात्र त्यानंतरही शहरात विविध समाज माध्यमांमधून पीडित चिमुकल्यांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल चुकीची आणि संताप जनक माहिती प्रसारित केली जात होती. अनेक नागरिकांच्या व्हाट्सअप स्टेटस वर चुकीची माहिती देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचे चुकीचे संदेश ठेवण्यात आले होते. या संदेशांमुळे शहरात पुन्हा एकदा अफवांचा बाजार तेजित होता. काही नागरिक कोणत्याही वृत्ताची पडताळणी न करता संदेश प्रसारित करत होते. त्यामुळे गोंधळ आणखीच भर पडत होती. या प्रकरणात सुरुवातीपासून पीडित कुटुंबीयांसोबत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संगीता चेंदवणकर यांच्याशी संपर्क केला असता, या दोन चिमुकल्यांची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित कुटुंबाला कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र अशा अफवा पसरवणे चुकीचे असून आम्ही कुटुंबाच्या कायम संपर्कात आहोत, असेही चेंदवणकर यांनी सांगितले आहे. काही विरोधी पक्षाचे पदाधिकारी अशा पद्धतीने चुकीचे संदेश जाणून-बुजून पसरवत असल्याची चर्चा शहरात रंगली होती.

Guillain Barre syndrome treatment
‘जीबीएस’च्या उपचारांवरून आमदारांची नाराजी, अवास्तव दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
yamuna river poisonous
यमुनेत विष मिसळल्याच्या केजरीवाल यांच्या आरोपाने खळबळ; प्रकरण काय?
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Anand Anil Khode from Akola will lead commanding procession of All India NCC Parade in Delhi
अकोल्यातील आनंदचे दिल्लीमध्ये संचलनात नेतृत्व, सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाचे नेत्रदिपक यश
niv test reveals the root cause of rare guillain barre syndrome disorder
‘एनआयव्ही’च्या तपासणीतून अखेर दुर्मीळ ‘जीबीएस’ विकाराचे मूळ कारण उघड; कशामुळे धोका जाणून घ्या…
Story img Loader