बदलापुरातील दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर मंगळवारी मोठा जनक्षोभ उसळला. बुधवारी शहरात तणावपूर्ण शांतता असली तरी अफवांचा बाजार तेजीत होता. सुरुवातीला चिमुकल्यांच्या कुटुंबीयांबद्दल आणि सायंकाळनंतर चक्क चिमुकल्यांबद्दल चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली. मात्र या सर्व अफवा होत्या, अशी माहिती कुटुंबीयांच्या सहकाऱ्यांनी कळवले. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही आवाहन या प्रकरणात पुढाकार घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी मदत करणाऱ्या संगीता चेंदवणकर यांनी दिली आहे. बदलापुरातील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर देशभरात संताप व्यक्त होतो आहे. मंगळवारी शहरात मोठा जनक्षोभ उसळल्यानंतर बुधवारी शहरात तणावपूर्ण शांतता होती. अफवा आणि नागरिकांमध्ये पुन्हा चुकीची माहिती प्रसारित होऊ नये म्हणून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या आदेशानंतर २० ऑगस्टपासून बुधवारी मध्यरात्रीपर्यंत बदलापूर शहरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा