सोसायटीच्या आवारात रांगोळी काढण्यासाठी चाललेल्या एका तरुणीच्या हातामधील रांगोळी जिने उतरत असताना अचानक एका सदनिकेसमोर सांडली. याप्रकरणी मुलीचे वडील सदनिका मालकाची माफी मागत असताना त्यांच्या घरातील तीन सदस्यांनी माफी मागणाऱ्या वडिलांसह मुलगी, तिच्या आईला बेदम मारहाण केली. कल्याण जवळील आंबिवली येथे एनआरसी कॉलनी येथे हा प्रकार रविवारी दुपारी घडला आहे.

हेही वाचा >>> राज्यात नव्या युतीची नांदी? श्रीकांत शिंदेंनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने चर्चेला उधाण

खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. रोहीत बनसोडे असे तक्रारदाराचे नाव आहे. हरिष त्यागी, सुभाष त्यागी, प्रतिभा त्यागी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, रोहित बनसोडे यांची मुलगी दिवाळी निमित्त सोसायटी आवारात रांगोळी काढण्यासाठी रविवारी दुपारी चालली होती. जिने उतरत असताना तिच्या हातून चुकून रांगोळी त्यागी यांच्या सदनिकेच्या दरवाजा समोर सांडली. सांडलेली रांगोळी आम्ही भरतो. जागा स्वच्छ करुन देतो असे मुलीचे वडील रोहित बनसोडे त्यागी कुटुंबीयांना सांगत होते. यावेळी हरिष यांनी बनसोडे यांची काहीही ऐकून न घेता त्यांना लोखंडी सळईने मारहाण करण्यास सुरुवात केली. रोहित यांना मारहाण होत असताना त्यांची पत्नी, मुलगी भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडले. त्यांनाही त्यागी कुटुंबीयांनी मारहाण केली.

Story img Loader