लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: नौपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई घनश्याम गायकवाड यांचा सहा महिन्यांपूर्वी कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला होता. ठाणे पोलिसांच्या प्रयत्नानंतर घनश्याम यांच्या कुटुंबियांना एचडीएफसी बँकेकडून एक कोटी रुपयांच्या विम्याची रक्कम मिळाली आहे.

नौपाडा पोलीस ठाण्यात घनश्याम गायकवाड हे नेमणूकीस होते. १२ नोव्हेंबर २०२२ मध्ये घनश्याम हे कर्तव्यावर असताना पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास नितीन कंपनी पूलाजवळ एका भरधाव कंटेनरने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घनश्याम यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले होते. पोलीस दलातही त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला जात होता. दरम्यान, ठाणे पोलिसांनी पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांची वेतन खाती एचडीएफसी या बँकेत सुरु केली होती. त्यावेळी बँकेसोबत एक करार करण्यात आला आहे. या करारानुसार दलातील कर्मचाऱ्याचे अपघाती निधन झाल्यास बँकेकडून कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम मिळणार आहे.

आणखी वाचा-कल्याण मधील करोना बाधित रुग्णाला भरपाई देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश

पोलीस शिपाई घनश्याम यांच्या निधनानंतर पोलीस दलाने विमा दावा बँकेकडे सादर केला होता. बँकेतील अधिकाऱ्यांनी तातडीने हा दावा मंजूर केला. त्यामुळे अपघातातील विमा रकमेतील एक कोटी रुपयांचा धनादेश घनश्याम यांची आई मंगल गायकवाड यांना ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्या हस्ते देण्यात आला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Family of the police constable who died in the accident received rs 1 crore as insurance mrj
Show comments