ठाणे : शिळफाटा मार्गावर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका रिक्षाची कंटेनरला धडक बसल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीस आला. या धडकेत रिक्षा चालक अशोक कुमार (३२) हे जखमी झाले असून त्यांच्यावर ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिळफाटा येथून पनवेलच्या दिशेने अशोक कुमार हे रिक्षा घेऊन जात होते. त्यावेळी रिक्षामध्ये कोणीही प्रवासी नव्हते. त्यांची रिक्षा शिळफाटा येथील राॅयल उपहारगृह परिसरात आली असता, रस्त्यालगत उभ्या असलेल्या कंटेनरला त्यांच्या रिक्षाची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाच्या पुढील भागाचा चुराडा झाला. तसेच अशोक कुमार हे गंभीर जखमी अवस्थेत रिक्षात अडकून राहिले. घटनेची माहिती वाहतुक पोलीस आणि शिळ-डायघर पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने अशोक कुमार यांना रिक्षातून बाहेर काढण्यात आले. अशोक कुमार यांना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. पोलीस पथकांनी यंत्रणेच्या साहाय्याने रिक्षा रस्त्याच्या बाजूला केली. त्यानंतर येथील वाहतुक सुरळीत झाली.