ठाणे येथील मनोरुग्णालयाजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत एका ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. राजेश वाल्मिकी (४१) असे मृताचे नाव असून याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोरुग्णालयाजवळील साठेवाडी भागात राजेश वाल्मिकी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते. शनिवारी मध्यरात्री राजेश आणि मुलगा आदित्य (१६) हे दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत स्थानिकांना आढळून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य हा बोलण्याच्या स्थितीत असल्याने त्याला अपघाताबद्दल विचारले असता, एका भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर दोघांनाही स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु राजेश यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father dies son injured in two wheeler accident in thane tmb 01