ठाणे आणि भिवंडी शहरातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मार्गावरील कशे‌ळी खाडी पुलावर माती आणि रेतीचे ढिगारे साचल्याच्या मुद्दयावरून टीका करण्यात येत आहे. संबंधित विभागाने पुलावरील माती आणि रेतीचे ढिगारे जेसीबीच्या साहय्याने बाजूला करण्याचे काम दोन दिवसांपुर्वी सुरु केले होते. मात्र, काही ठिकाणचे माती आणि रेतीचे ढिगारे हटविण्यात आलेले असले तरी काही ठिकाणी हे ढिगारे ‘जैसे थे’च असल्याचे दिसून येत आहे. तसेच ढिगारे उचलण्याचे कामही बंद झाल्याने पुलांवर अपघातांची भीती कायम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘ईडी’कडून कल्याण-डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांची चौकशी, बेकायदा बांधकामांचे अहवाल ‘ईडी’, ‘एसआयटी’कडे दाखल

ठाणे आणि भिवंडी शहराच्या वेशीवर असलेल्या कशेळी-काल्हेर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. या भागातील ग्रामपंचायतींच्या अख्यारीत येणारे अंतर्गत रस्ते काँक्रीटचे असून हे रस्ते सुस्थितीत असल्याचे दिसून येते. या भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कशेळी ते अंजुरफाटा या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अवजड वाहनांसह इतर वाहनांची सतत वर्दळ सुरु असलेल्या या मार्गावर मोठे खड्डे पडले असून त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्ता उंच-सखल झाला आहे. काही ठिकाणी डांबराच्या साह्यायने खड्डे भरणीची कामे करण्यात आली असली तरी काही ठिकाणी अद्यापही खड्डे भरलेले नाहीत. खराब रस्त्यामुळे धुळीचे प्रदुषण वाढले आहे. यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच, या मार्गावरील कशेळी खाडी पुलावर माती आणि रेतीचे ढिगारे साचल्याची दिसून येत आहे. या ढिगाऱ्यांमधील माती व रेती रस्त्यावर इतरत्र पसरून त्यावरून दुचाकी घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. या शिवाय, माती आणि रेतीच्या ढिगाऱ्यांना वाहन धडकूनही अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा- “२०२३ मध्ये राज्यात निवडणूका लागणार; भाजपामध्येच प्रचंड…”; सुषमा अंधारेंनी सांगितलं ‘कामाला लागा!’

मुद्दयावरून टिका होऊ लागताच, संबंधित विभागाने पुलावरील माती आणि रेतीचे ढिगारे जेसीबीच्या साहय्याने बाजुला करण्याचे काम दोन दिवसांपूर्वी सुरु केले होते. मात्र, काही ठिकाणचे माती आणि रेतीचे ढिगारे हटविण्यात आले आहेत. तर, काही ठिकाणचे ढिगारे हटविण्यात आलेले नाही. तसेच याठिकाणी ढिगारे हटविण्याचे कामही बंद झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुलावर काही ठिकाणी माती आणि रेतीचे ढिगारे ‘जैसे थे’च असल्याचे दिसून येत आहे. तसेच ढिगारे उचलण्याचे कामही बंद झाल्याने पुलांवर अपघातांची भिती कायम आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fear of accidents due to mudslide on kasheli khadi bridge thane dpj