ठाणे : राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांची शुक्रवारी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू असताना, पत्रकारांच्या गराड्यात शिरून एकजण मोबाईलमध्ये परिषदेसह उपस्थितांचे चित्रीकरण करू लागला. ही बाब आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी त्याला पकडले आणि त्यानंतर आव्हाड यांनी चौकशी करताच, तो ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेतील कर्मचारी असल्याचे समोर आले. पोलिसांकडून आपल्या घरावर लक्ष ठेवले जात असल्याच्या कारणावरून संतापलेल्या आव्हाडांनी तात्काळ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना फोनवरूनच जाब विचारत फैलावर घेतले.

कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांचे विवियाना माॅल परिसरात निवासस्थान आहे. याठिकाणी ते अनेकदा पत्रकार परिषदा घेतात. अशाचप्रकारे त्यांनी शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी परिषदेचे चित्रीकरण करत होते. याच दरम्यान, एक व्यक्ती पत्रकारांच्या गराड्यात शिरला आणि त्याने मोबाईलमधून पत्रकार परिषदेसह तिथे उपस्थित असलेल्यांचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. याठिकाणी उपस्थित असलेल्या आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना संशय आला आणि त्यांनी त्यांना बाजूला करत त्यांच्याकडे विचारणा सुरू केली. त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी ही बाब आव्हाड यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यानंतर आव्हाड यांनी त्याला बोलावून त्यांची चौकशी केली. यामध्ये त्याने ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेतील वर्तकनगर विभागाचा कर्मचारी असल्याची माहिती दिली. घरात शिरून चित्रीकरण करण्याची परवानगी कोणी दिली, अशी विचारणा आव्हाड यांनी करताच, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार चित्रीकरण केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांकडून आपल्या घरावर लक्ष ठेवले जात असल्याच्या कारणावरून आव्हाड संतापले आणि जोपर्यंत सुचना देणारा अधिकारी येत नाही तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याला तिथेच थांबवून ठेवण्याची भुमिका त्यांनी घेतली. त्यानंतर आव्हाडांनी तात्काळ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना फोनवरूनच जाब विचारत फैलावर घेतले. तसेच त्या कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गदा येऊ नये म्हणून आव्हाड यांनी त्यांना समज देऊन सोडून दिले.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Jitendra Awhad, Thane Bay coastal route ,
ठाणे खाडी किनारी मार्गाचा ठेका रद्द करा, आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
Jitendra Awhad, Mumbra Marathi case, Mumbra ,
मुंब्रा मराठी प्रकरणावर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लहान मुलांच्या वादाला…”
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?

हेही वाचा – ठाणे खाडी किनारी मार्गाचा ठेका रद्द करा, आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीत रात्री झाडांच्या आडोशाने बसणाऱ्या ८१ गांजा व्यसनींवर कारवाई

विरोधी पक्ष नेत्यांच्या घरावर लक्ष ठेवण्याचे काम पोलिस करत असल्याची बाब सर्वांसमोर उघड झालेली आहे. ही बाब खूप गंभीर आहे. आमच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडवर लक्ष ठेवले असते तर, तो आधी पकडला गेला असता. माझ्या घरात चित्रीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबित करून हात वर केले असते. त्या कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गदा येऊ नये म्हणून त्याला सोडून दिले. – जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

Story img Loader