डोंबिवली- कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील नि‌ळजे गाव तलावाकाठी बांधण्यात येत असलेल्या व्हर्साटाईल डेव्हलपर्सच्या विकासकाने गेल्या आठ वर्षाच्या काळात इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता, दिलेल्या वेळेत सदनिकेचा ताबा ग्राहकाला दिला नाही म्हणून या गृहप्रकल्पात नोंदणी केलेल्या एका नोकरदाराने विकासक आणि त्याच्या तीन भागीदारांविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात ३३ लाख ५७ हजार ८४८ रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हर्साटाईल डेव्हलपर्सचे मालक आनंद मुलराजभाई ठक्कर (४६, रा. पारूल न्यू माणिकलाल मेहता इस्टेट, घाटकोपर, मुंबई), जागृती आनंद ठक्कर (४०), तेजस भाटे (३५, रा. निळजे गाव), आमिष शहा (४०, रा. निळजे गाव) यांच्या विरुध्द शीळ रस्त्यावरील लोढा पलावा नागरी वसाहतीत कासारिओ संकुलात राहणाऱ्या अरविंद आठनेरे (४२) यांनी तक्रार केली. या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मानपाडा पोलिसांनी दिली.

हे ही वाचा – भिवंडी : कंत्राटाचे देयक मंजूर केल्याबद्दल लाच मागणारा ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामसेवक ताब्यात

पोलिसांनी सांगितले, अरविंद आठनेरे यांनी निळजे गावाच्या बाहेर तलावाच्या काठी व्हर्साटाईल डेव्हलपर्सकडून उभारण्यात येणाऱ्या गृहसंकुलात ३३ लाख ५७ हजार ८४८ रुपये किमतीला एक सदनिकेची नोंदणी मे २०१४ मध्ये केली होती. अरविंद यांनी टप्प्याने हे पैसे विकासकाला दिले होते. ठरावीक मुदतीत अरविंद यांना सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. असेच आश्वासन इतर ग्राहकांना दिले होते. सदनिकेचा ताबा देण्याची वेळ निघून गेली तर नवीन गृहसंकुल उभे राहत नाही. विकासक बांधकाम परवानग्या मिळाल्या की कामे सुरू होणार अशी साचेबध्द उत्तरे अरविंद आणि याठिकाणी घराची नोंदणी करणाऱ्या इतर रहिवासांना देत होते. आठ वर्ष उलटले तरी घराचा ताबा विकासकाकडून मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने अरविंद आठनेरे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात विकासक आणि त्याच्या भागीदार, कर्मचाऱ्यांविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir against versatile developer for not giving possession of flat in dombivali in time zws