ठाणे : डायघर येथील भांडार्ली भागात औद्योगिक कचऱ्याच्या साठवणूकीप्रकरणी मोहम्मद आरीफ अल्ताफ हुसेन खान याच्याविरोधात सोमवारी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडार्ली येथील ठाणे महापालिकेच्या घनकचरा संकलन केंद्राची पाहणी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी गेले होते. संकलन केंद्राची पाहणी केल्यानंतर अधिकारी परतत असताना त्यांना परिसरातील एका गाळ्यामध्ये आणि मोकळ्या जागेत एकूण १५ टन औद्योगिक कचरा आढळून आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात आणणारी कृती केल्याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गाळ्याचा मालक मोहम्मद आरीफ अल्ताफ हुसेन खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औद्योगिक कचऱ्याच्या साठवणूकीप्रकरणी गुन्हा दाखल
संकलन केंद्राची पाहणी केल्यानंतर अधिकारी परतत असताना त्यांना परिसरातील एका गाळ्यामध्ये आणि मोकळ्या जागेत एकूण १५ टन औद्योगिक कचरा आढळून आला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 21-11-2023 at 22:16 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir registered regarding storage of industrial waste in thane zws