ठाणे : डायघर येथील भांडार्ली भागात औद्योगिक कचऱ्याच्या साठवणूकीप्रकरणी मोहम्मद आरीफ अल्ताफ हुसेन खान याच्याविरोधात सोमवारी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडार्ली येथील ठाणे महापालिकेच्या घनकचरा संकलन केंद्राची पाहणी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी गेले होते. संकलन केंद्राची पाहणी केल्यानंतर अधिकारी परतत असताना त्यांना परिसरातील एका गाळ्यामध्ये आणि मोकळ्या जागेत एकूण १५ टन औद्योगिक कचरा आढळून आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात आणणारी कृती केल्याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गाळ्याचा मालक मोहम्मद आरीफ अल्ताफ हुसेन खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा